शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे टोकन बुक संशयास्पद

By admin | Updated: March 19, 2017 19:51 IST

तेल्हारामधील नाफेडची तूर खरेदी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवºयात सापडली आहे.

नाफेड तूर खरेदी प्रकरण : नाफेड रजिस्टरमध्ये नोंद नाहीतेल्हारा: तेल्हारामधील नाफेडची तूर खरेदी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्रास देऊन व्यापाऱ्यांचा माल मोजण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. आता तर चक्क टोकन बुकच संशयास्पद असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.गेल्या दीड महिन्यापासून बाजार समिती यार्डात सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी होत आहे. डुकराच्या त्रासाबरोबरच किरकोळ चोरीचे प्रकारसुद्धा येथे घडले. बाजार समितीच्या यार्डात असलेल्या मालाची देखरेख करणे, बाजार समितीचे काम असले तरी बाजार समिती प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालापेक्षा व्यापारी, दलालाच्या मालाचे मोजमाप त्वरित होते.नाफेडमध्ये तूर खरेदीस आणताना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेश पत्रिका भरून घेते. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, गाव, धान्याचा प्रकार, वजन, गाडी नंबर, फॅक्टरीचे नाव, गट नंबर, दाखला, दिनांकासह माहिती भरली जाते. याबाबतची नोंद नाफेडच्या रजिस्टरमध्ये असणे गरजेचे आहे; परंतु या ठिकाणी बाजार समितीमधील आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद आहे; परंतु नाफेड रजिस्टरमध्ये नोंद नसलेल्या शासकीय खरेदी प्रवेश पत्रिका टोकन नं. ०६४, ०६५ या संशयास्पद असल्याचे दिसते. सदर पावत्यावरसुद्धा धान्य मार्केटमधील आवक रजिस्टरमध्ये नोंद झालेली आहे असे वरून लिहिलेले आहे. सदर पावत्यांची नाफेडच्या रजिस्टरमध्ये कसलीही नोंद नसतानाही सदर पावतीवरील तुरीचे मोजमाप झालेले आहे. एकंदरीत हा सर्व प्रकार संशयास्पद असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)सदर प्रकार गंभीर असून याबाबत बाजार समितीच्या सभेत मुद्दा उपस्थित करून दोषी असणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी करू.- श्यामशील भोपळेबाजार समिती, तेल्हाराबाजार समिती गेटवर आवक येत असताना समितीच्या आवक रजिस्टरमध्ये नोंद होते. त्यावरून टोकन रजिस्टर तयार होते. टोकनवरून मोजमाप केले जाते.- माधव पाथ्रीकरसचिव, बाजार समिती, तेल्हारा.