शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून स्पोर्ट्स फेस्टिव्हलची ‘दंगल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 02:39 IST

उद्घाटन सोहळ्य़ात ‘लेझर शो’, ‘मार्च पास्ट’ राहणार प्रमुख आकर्षण.

अकोला, दि. ५- जिल्ह्यातील २७१५ खेळाडू आणि क्रीडा रसिकांची प्रतीक्षा शुक्रवारी संपत असून लोकमत समुह आयोजित लोकमत अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हलची 'दंगल' ६ ते ८ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. लोकमत स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या उदघाटनप्रसंगी होणारा 'लेझर शो', तात्या विंचू फेम सत्यजित पाध्ये यांचा 'पपेट शो', सहभागी शाळांचा 'मार्च पास्ट' हे विशेष आकर्षण ठरणार आहे.अकोला जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने लोकमत समुहातर्फे या फेस्टीव्हलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. रायफल शुटींग, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बुद्धिबळ, कबड्डी, ज्यूडो, धनुर्विद्या, टेबल टेनिस, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती, अँथलेटीक्स आणि कॅरम या विविध १४ खेळांचा यामध्ये समावेश आहे. १४ व १७ वर्ष वयोगटाखालील मुला मुलींमध्ये ही स्पर्धा होत असून असून जिल्ह्यातील ५६ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. सांघिक विजेतेपद पटकावणार्‍या शाळेला भव्य चषक देण्यात येणार आहे. विजेत्या, उपविजेत्या व तृतीय स्थानी राहिलेल्या खेळाडूंना गोल्ड, सिल्व्हर आणि बाँझ मेडलने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय सांघिक क्रीडा प्रकारात १२ विजेत्या व १३ उपविजेत्या संघांना चषक देण्यात येणार आहे. ५६ शाळांतील २७१५ खेळाडूंमध्ये पदकांसाठी प्रभात किड्स डे बोर्डिंंग, वाशिम रोड, अकोला येथे ही 'दंगल' रंगणार आहे. भव्य लेझर शो आणि तात्या विंचू फेम सत्यजित पाध्ये त्यांच्या गमतीदार शैलीत बोलक्या बाहुल्यांनी मनोरंजन करणार आहेत. यासोबतच योगी डान्स ग्रुपचे कलाकार आपला नृत्याविष्कार सादर करणार आहेत. सहभागी शाळांची 'मार्च पास्ट' आणि रंगारंग कार्यक्रमाची यावेळी मेजवाणी राहणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी फटाक्यांची शानदार आतिषबाजी होणार आहे. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अरुण विधळे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अकोला स्पोर्टस फेस्टीव्हलच्या उदघाटनप्रसंगी जिल्ह्यातील क्रीडा संघटक, क्रीडा रसिक तसेच सहभागी खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.