शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

आज शाळा प्रवेशोत्सव

By admin | Updated: June 26, 2015 01:51 IST

३ लाख ५७ हजार ३९३ विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज.

अकोला : विदर्भातील शाळांची घंटा शुक्रवार २६ जून रोजी वाजणार असून ९२२ शाळांमध्ये ३ लाख ५७ हजार ३९३ विद्यार्थी शाळा प्रवेश करणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागातर्फे शाळा प्रवेशोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. शाळा प्रवेशोत्सवाच्या वेळी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक शाळांच्या पटांगणात पाणी साचल्याने चिखल आणि गवतामुळे अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अस्वच्छतेतच बसावे लागणार असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. अमरावती विभागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शुक्रवारी सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागातर्फे मोठय़ा प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंददायी वातावरण निर्मिती व्हावी या अनुषंगाने प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. तसेच शाळेचा पहिला दिवस म्हणून शाळेमध्ये साफसफाई, शाळेच्या पटांगणात स्वच्छता आणि रांगोळी घालून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे, असे आदेश शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्वच शाळांना दिले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे आणि प्रसन्न वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी वाढणार असून, उपस्थिती वाढीस मदत होणार आहे. एककडे शिक्षण विभागाची शाळाप्रवेशाबाबत जोरात तयारी सुरू आहे तर दुसरी कडे मात्र, पावसामुळे शाळांच्या पटांगणाची दुरवस्था झालेली आहे. गत काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शाळांच्या पटांगणात डबके साचले आहेत. यातील बहुतांश डबके कोरडे झाले असले तरी, सुकलेले चिखल आणि गवत वाढले आहे. तसेच परिसरात मोठय़ा प्रमाणात कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांंना बसण्यासाठीदेखील योग्य जागा उपलब्ध होऊ शकणार नाही.