शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेचा श्रीगणेशा

By admin | Updated: April 13, 2017 01:48 IST

मुख्यमंत्री करणार ई-भूमिपूजन; लोकप्रतिनिधी, नगरसेवकांची उपस्थिती

अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामांसाठी नगर विकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या तांत्रिक मूल्यमापन समिती व उच्चाधिकार समितीने ८७ कोटींच्या निविदेला मंजुरी दिल्यानंतर उद्या (गुरुवार) सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेच्या कामाचे ई-भूमिपूजन केले जाणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामात सुधारणा करण्याचा समावेश असून, दुसऱ्या टप्प्यात भूमिगत गटार योजना कार्यान्वित केली जाईल. ‘अमृत’ योजनेसह नगरोत्थान अभियानच्या माध्यमातून राज्यातील २८ शहरांमध्ये तब्बल १ हजार ६२२ कोटी रुपयांच्या विकास कामांना सुरुवात केली जाईल. त्या पृष्ठभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच वेळी २८ शहरांमधील विकास कामांचा ई-भूमिपूजनाच्या माध्यमातून श्रीगणेशा केला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये ई-भूमिपूजनाची लाइव्ह व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील तसेच खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ.रणधीर सावरकर, आ. श्रीकांत देशपांडे, उपमहापौर वैशाली शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहील. ‘अमृत’ योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केलेल्या २५४ कोटींच्या ‘डीपीआर’ (प्रकल्प अहवाल) मधील ११० कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावाला शासनाच्या तांत्रिक मूल्यमापन समिती व उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. ४२६ कि.मी.ची पाइपलाइन बदलणार!‘अमृत’ योजनेंतर्गत महान धरण ते अकोला शहरापर्यंतची १६१ कि.मी.ची मुख्य जलवाहिनी बदलण्यात येईल. तसेच शहरातील मुख्य जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात २६५ कि.मी.ची नवीन जलवाहिनी टाकण्याचा समावेश आहे. सोबतच शहराच्या विविध भागात आठ जलकुं भांची उभारणी केली जाणार आहे. ई-भूमिपूजनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकाच वेळी २८ शहरांतील विकास कामांचे उद्घाटन करतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये मनपा प्रशासनाने व्यवस्था केली असून, हा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. -विजय अग्रवाल, महापौर