शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

खतांसाठीही लागणार अंगठा, आधार

By admin | Updated: May 16, 2017 02:03 IST

१ जूनपासून पॉस मशीनद्वारे खतांची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खतांचा काळाबाजार रोखण्यासोबतच टंचाईच्या काळात सर्वांनाच समान खत वाटपाचा उपाय म्हणून १ जूनपासून शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि अंगठा टेकवल्याशिवाय खत मिळणार नाही. त्यासाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये ४३१ पॉस (पॉइंट आॅफ सेल) मशहन लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.रासायनिक खतांच्या विक्रीवरील अनुदानाचे थेट लाभ हस्तांतरण उत्पादक कंपन्यांकडे केले जाते. त्यानुसार कंपन्यांनी विक्री केलेल्या एकूण खतांवर ते दिले जाते. संबंधित कंपनीकडून पुरवठा केलेले खत शेतकऱ्यांनाच वाटप झाले की नाही, याबाबतची खातरजमा करणे अशक्य होते. पोटॅश आणि युरिया खतांचा वापर अनेक उद्योगांमध्ये केला जातो. त्या उद्योगांना पुरवठा केलेल्या खतांचे अनुदानही कंपन्यांनी वसूल केल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराला आता चाप बसणार आहे. सोबतच खतांचा काळाबाजार करणे, टंचाईच्या काळात ठरावीक शेतकऱ्यांनाच पुरवठा होणे, याबाबीही आता पॉस मशीन थांबवणार आहे. खत खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डची आॅनलाइन पडताळणी होणार आहे. तसेच त्याच व्यक्तीने खत घेतल्याची नोंद म्हणून त्याचा अंगठाही घेतला जाणार आहे. केंद्र शासनाने आधीच यादी तयार केल्यानुसार अकोला जिल्ह्यात ४३१ कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन लावली जाणार आहे. ती मशीन पुरवणे, विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे, आॅनलाइनसाठी समन्वय ठेवण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. संयुक्त खतांसाठी आवश्यक, मिश्र खते वगळलीरासायनिक खतांची पॉस मशीनद्वारे विक्री करताना त्यातून मिश्र खते वगळण्यात आली आहेत. संयुक्त खते, युरिया आणि एसएसपी या खतांसाठीच पॉस मशीनचा वापर होणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडून २०:२०:० आणि १८:१८:१० या मिश्र खतांची पॉस मशीनशिवाय विक्री होणार आहे. तसेच ही खते स्थानिक उत्पादक कंपन्यांची आहेत. पॉस मशीनद्वारे विक्री होणारी खते राष्ट्रीय स्तरावर उत्पादन असलेल्या कंपन्यांची आहेत. तालुकानिहाय यादी नसल्याने घोळराज्य शासनाने पॉस मशीन लावण्यासाठी उपलब्ध केलेली ४३१ कृषी सेवा केंद्रांची नावानिशी यादी कृषी विभागाला दिली आहे. त्यामध्ये पत्ता किंवा संपूर्ण नाव नसल्याने कोणत्या तालुक्यात किती मशीनचा पुरवठा करावा लागणार, याचा अंदाज घेणे सुरू आहे. जिल्हाधिकारी नोडल अधिकारीया संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अधीक्षक कृषी अधिकारी यांना संनियंत्रण करावे लागणार आहे. तर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांना अंमलबजावणी करावी लागणार आहे.नव्या विक्रेत्यांचीही ‘पॉस’साठी नोंदणीशासनाने आधी नोंदणी केलेल्या कृषी सेवा केंद्रांमध्ये पॉस मशीन लावण्यासाठी कंत्राटदार कंपन्यांची नावे निश्चित केली आहेत. त्या कंपन्यांकडून मशीन लावणे, प्रशिक्षण देणे सुरू असतानाच ज्या विक्रेत्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनाही नोंद करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विक्रेत्यांच्या चलाखीला लगामटंचाईच्या काळात ठरावीक ग्राहकांनाच खते देणे, काळाबाजार करणे, अधिक दर वसुल करणे, त्यासाठी विविध प्रकारची चलाखी करणाऱ्या विक्रेत्यांना आता लगाम लागणार आहे. त्यातच उद्योजकांना पुरवठा केलेल्या युरिया, पोटॅश शेतकऱ्यांच्या नावे दाखवण्यालाही चाप बसणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा सोयीचा उपाय आहे. त्यांनी आधार कार्ड आणि अंगठा नोंदवून खरेदी करण्याची सवय लावून घ्यावी, त्यातून पुढील काळात त्यांना सोयीचे होणार आहे. - सतीश वाघोडे, उपप्रबंधक, आरसीएफ, अकोला.