शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

तीन बाजार समित्या बंद

By admin | Updated: July 12, 2016 01:26 IST

व्यापारी, अडत्यांनी पुकारले असहकार आंदोलन : फळे, भाजीपाला नियमनमुक्तीचा कडाडून विरोध.

अकोला : फळे व भाजीपाला नियंत्रणमुक्त करतानाच शेतकर्‍यांऐवजी खरेदीदाराकडून व्यापार्‍यांचे कमिशन (अडत) घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापारी, अडत्यांनी ९ जूलैपासून पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी कडकडीत बंद होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतमालाची विक्री सध्या बंद आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्याची थेट विक्री करणार्‍यांना शासनाने सर्व नियमातून सूट दिली. बाजार समितीमध्ये मात्र शेतकर्‍यांऐवजी ग्राहकांकडून अडत घेण्याचे बंधन घातले. या दुहेरी भूमिकेचा निषेध करण्यासाठी व्यापार्‍यांनी बेमुदत सामूहिक आंदोलन सुरू केले आहे.जिल्ह्यात अकोला, मूर्तिजापूर, तेल्हारा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून, कानशिवणी व बोरगाव मंजू आदी उपबाजार समिती अस्तित्वात आहे. व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे सर्वच बाजार समित्यांचे व्यवहार सोमवारी ठप्प झाले. सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांकडून एकूण रकमेच्या ८ टक्के अडत वसूल केली जाते. मात्र, शेतकर्‍यांच्या हितास्तव शासनाने शेतकर्‍यांकडून अडत वसूल न करता ग्राहकांकडून वसुलीचा निर्णय घेतला. त्यास व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. तथापि, अडते आणि व्यापार्‍यांनी शेतीमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचे घोषित केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन बाजार समिती प्रशासन तथा जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय साधून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे.