शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

तहसीलदारांना दिली धमकी; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 02:03 IST

तेल्हा-यात रेतीची अवैध वाहतूक; कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांना धमकी

तेल्हारा: तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक जोरात सुरू असून, कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांना धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेल्हारा तालुक्यात रेती माफिया सक्रिय असून, मोठय़ा प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी तेल्हारा तहसीलदार व त्यांच्या चमूने कारवाईचा बडगा उगारत आतापर्यंत रेतीची चोरटी वाहतूक करणार्‍या ३५ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. त्यामुळे रेती माफियांचे पित्त खवळले. दरम्यान, १८ जानेवारी रात्री मनतकार पेट्रोल पंपाजवळ एक नवीन विनाक्रमांकाचा ट्रक रेती वाहून नेत असल्याचे तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार भारत किटे, मंडळ अधिकारी एम. जी. काळे, एम. टी. भोपळे, ओ. एम. वारुळकर यांच्या निदर्शनास आले. ट्रकमध्ये दोन ब्रास रेती होती. अधिकार्‍यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालक व मालकाने अधिकार्‍यांना धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे तहसीलदार पाटील यांनी मंगळवारी सकाळी तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी ट्रकचालक सुदर्शन बोदडे व मालकाविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३५३, ५0६, ३४ अन्वये व गौण खनिज कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार शे. अन्वर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत गवळी, नागोराव, भांगे करीत आहेत. तहसिलदारांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीमध्ये विकास पवार याच्याही नावाचा उल्लेख केला आहे.