तेल्हारा : तालुक्यातील निंभोरा येथील तलाठी अंकुश मानकर यांना वाळूची अवैध वाहतूक करणार्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मानकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तेल्हारा महसूल विभागाने गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. तलाठी अंकुश रामदास मानकर हे शासकीय कामानिमित्त निंभोरा येथे जात असताना त्यांना एम.एच. ३० ए.बी. ९३३६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू असल्याचा संशय आला. त्यांनी ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली. त्यावेळी ट्रॅक्टर चालकाने शासकीय कामात अडथळा आणून मानकर यांना धक्काबुक्की केली. आपले वाहन तपासले तर ट्रॅक्टरने उडवून देईन, अशी धमकीही ट्रॅक्टर चालकाने मानकर यांना दिली. मानकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक अश्विन टोहरे, किशोर टोहरे दोघेही रा. बेलखेड यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३४३, १८६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
वाळू माफियाची तलाठ्यास जीवे मारण्याची धमकी
By admin | Updated: May 31, 2014 21:54 IST