शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत हजारो क्विंटल तूर खरेदीचे केंद्रांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. तूर विक्रीसाठीचे टोकन आणि त्यानंतर बाजार समितीमध्ये नोंदणी केलेल्या ३ हजारांपेक्षाही अधिक शेतकर्‍यांची ६४ हजारांपेक्षाही अधिक क्विंटलची खरेदी चार दिवसात करण्याचे आव्हान जिल्हय़ातील पाच केंद्रांपुढे आहे.शासनाने २६ जुलैपासून तूर खरेदी पुन्हा सुरू केली. ...

ठळक मुद्देतूर विक्रीसाठी शेतकर्‍यांची नोंदणी संख्याही घटली!साठवणुकीसाठी जागेचाही वांधा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. तूर विक्रीसाठीचे टोकन आणि त्यानंतर बाजार समितीमध्ये नोंदणी केलेल्या ३ हजारांपेक्षाही अधिक शेतकर्‍यांची ६४ हजारांपेक्षाही अधिक क्विंटलची खरेदी चार दिवसात करण्याचे आव्हान जिल्हय़ातील पाच केंद्रांपुढे आहे.शासनाने २६ जुलैपासून तूर खरेदी पुन्हा सुरू केली. त्यानंतरही मोठय़ा प्रमाणात टोकन घेतलेले शेतकरी केंद्रावर आले नाहीत. त्यामुळे नेमक्या किती शेतकर्‍यांची तूर घरात पडून आहे, याचा अंदाज घेण्यासाठी सर्व शेतकर्‍यांना १९ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले होते. त्यानुसार जिल्हय़ातील पाचही केंद्रांवर त्या दिवशी ३,१४६ शेतकरी आले. त्यांच्याकडे ६४,३२७ क्विंटल तूर असल्याचे स्पष्ट झाले. त्या शेतकर्‍यांची तूर खरेदी केंद्रावर सुरू आहे. ३१ ऑगस्टपर्यंत तूर खरेदीची मुदत आहे. त्यामुळे बाजार समितीमधून टोकन घेतलेले शेतकरी आहेत की नाहीत, घरी तूर असलेल्यांना विक्री करावयाची आहे की नाही, ही बाब पडताळण्यात आली. त्यासाठी  शेतकर्‍यांचा सात-बारा, टोकन, पंचनाम्याची प्रत तसेच इतर आवश्यक कागदपत्रे पाहूनच शेतकरी संख्या निश्‍चित झाली. बाजार समिती केंद्रात नोंद करणार्‍यांसोबतच इतरही शेतकरी केंद्रावर तूर आणत आहे. अर्थातच त्यांच्याकडे आधीचे टोकन आणि पंचनामे आहेत. त्यामुळे त्या सर्वांची तूर खरेदी केली जात आहे. आता ३१ ऑगस्टपर्यंत खरेदीसाठी चार दिवस उरले आहेत. या चार दिवसात ३0 ते ४0 हजार क्विंटल तूर खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे; मात्र ठरलेल्या मुदतीत ती होते की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे किमान नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांची तूर खरेदी व्हावी, यासाठी प्रशासनापुढे आव्हान आहे. त्यासोबतच नोंदणी न केलेल्या शेतकर्‍यांची तूर खरेदीही करावीच लागत आहे. त्यातून प्रशासनाच्या खरेदीच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. 

साठवणुकीसाठी जागेचाही वांधाखरेदी केल्या जाणार्‍या तुरीची साठवणूक करण्यासाठी जागेचाही वांधा आहे. त्यामुळे जिल्हय़ातच साठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यावर उद्यापर्यंंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

तूर खरेदीच्या मुदतीपर्यंत केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यानंतर शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. या काळात संपूर्ण तूर खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. - बजरंग ढाकरे, जिल्हा मार्के टिंग अधिकारी, अकोला.