शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’चे ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’

By admin | Updated: June 27, 2016 02:41 IST

चमू आकोल्यात दाखल; जलयुक्त शिवारच्या सर्वच कामांची पाहणी होणार.

राजेश शेगोकार / अकोलाजलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी ह्यथर्ड पार्टी इन्स्पेक्शनह्ण करण्याचा शासनाचा आदेश असून, त्यानुसार अकोला जिल्ह्यातील कामांची तपासणी सुरू झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेत सिमेंट नाला बंधारा, नदी-नाला सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचे बळकटीकरण, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव, साठवण बंधार्‍यांची दुरुस्ती, कालवा दुरुस्ती आदी कामे कृषी, लघू पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषदतर्फे केली जात आहेत. या कामांची गुणवत्ता चांगली असावी, यासाठी जलसंधारण विभागाने ५ डिसेंबर २0१४ व १३ मार्च २0१५ रोजी आदेश जारी केला आहे. त्या आदेशानुसार योजनेतील कामे मार्चपूर्वी त्रयस्थ संस्थेकडून तपासून मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यानुसार अमरावती विभागात मूल्यमापन सुरू झाले असून, अमरावती, वाशिमनंतर ही चमू अकोला जिल्ह्यात कामांचे मूल्यमापन करण्यासाठी दाखल झाली आहे. नाबार्डच्या निर्देशावरून नॅपकॉनचे सहायक महाव्यवस्थापक खंडूजी काशीद यांच्या नेतृत्वात सहा सदस्य विविध कामांची पाहणी करीत आहेत. रविवारी पातूर, तालुक्यातील कामांची पाहणी पूर्ण केली असून, सोमवार नंतर इतर तालुक्यातील कामांचे मूल्यमापन ही चमू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वीच वाशीम जिल्ह्यातील ४00 कामांचे मुल्यामापन पुर्ण झाले आहे.या चमूमध्ये खंडूजी काशीद यांच्यासह राजेश खाडे, पवन रायकर, अमोल बनसोडे, विवेक बिर्‍हाडे, संतोष तंवर, संजय भवर यांचा समावेश आहे. या चमूने आज पातूर तालुक्यातील ६५ कामांची पाहणी केली असून, सोमवारपासून मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी तालुक्यातील कामांची पाहणी करणार आहे.यामुळे जलयुक्तचे खरे स्वरूप कळणार आहे.