अकोला : महापालिकेच्या पाण्याची चोरी करणार्या ऑर्बिट चिल्ड्रेन हॉस्पिटल, सोनोने आर्थोपेडिक हॉस्पिटल, त्रिमूर्ती होमिओपॅथीसह गुजराती स्वीटमार्ट व विविध अपार्टमेंटमधील तब्बल ४१ नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई गुरुवारी प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. या नळ जोडणीधारकांना ३ लाख ७४ हजार ४00 रुपयांचा दंड आकारण्यात आला.मनपातील जलप्रदाय विभागाच्यावतीने जठारपेठ चौकातील रामा एम्पायर येथे १0 अवैध नळ कनेक्शन, शंकर अपार्टमेंट- ७, मयूरेश्वर अपार्टमेंट- १0 तसेच सिद्धेश्वर अपार्टमेंटमधील १0 अवैध नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. यावेळी ऑर्बिट चिल्ड्रेन हॉस्पिटल, सोनोने आर्थोपेडिक हॉस्पिटल, त्रिमूर्ती होमिओपॅथीसह गुजराती स्विट मार्टच्या गोडावूनमधील प्रत्येकी एक नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई मनपाने केली. यावेळी दंडाची रक्कम जमा करणार्यांचे नळ कनेक्शन वैध करून देण्यात आले.मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, जलप्रदायचे कार्यकारी अभियंता नंदलाल मेश्राम व पथकातील कर्मचार्यांनी कारवाई केली.*राजकारणी, नगरसेवक अस्वस्थमनपाची कारवाई सुरू असताना काही नागरिकांनी मर्जीतले राजकारणी व नगरसेवकांना सुचित करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीसुद्धा काही नगरसेवकांनी अधिकार्यांना विनंती केली होती, मात्र नगरसेवकांच्या विनंतीला साफ फेटाळण्यात आले. एकीकडे प्रशासन पाणीपट्टी वसूल करीत नसल्याचे आरोप-प्रत्यारोप करायचे, अन् दुसरीकडे कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रकार खपवून घेणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे राजकारण्यांसह नगरसेवक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
पाण्याची चोरी पकडली; ४१ अवैध नळ कनेक्शन तोडले
By admin | Updated: August 15, 2014 01:24 IST