शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा विकास मंच न. प. ची निवडणूक लढविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

तेल्हारा : तेल्हारा विकास मंचची स्थानिक माहेश्वरी भवनात बैठक संपन्न झाली. या बैठकीत तेल्हारा विकास मंच आगामी नगरपालिका निवडणुकीच्या ...

तेल्हारा : तेल्हारा विकास मंचची स्थानिक माहेश्वरी भवनात बैठक संपन्न झाली. या बैठकीत तेल्हारा विकास मंच आगामी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असे विकास मंचचे अध्यक्ष राम फाटकर यांनी जाहीर केल्याने शहारातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. समाजातील प्रत्येक घटकांसह सर्वांनासोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मार्गदर्शक, सल्लागार समिती व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

तेल्हारा विकास मंचची बैठक मार्गदर्शक गजानन रेवस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तेल्हारा विकास मंचच्या उपाध्यक्षपदी कुशल संघटक प्रवीण पोहरकार, सरचिटणीसपदी स्वप्निल सुरे, तर संघटकपदी शेख ताजुद्दीन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. विकास मंचच्या अनु. जमाती आघाडीच्या अध्यक्षपदी विलास पवार यांची निवड केली आहे. बैठकीत आभार उपाध्यक्ष प्रवीण पोहरकार यांनी मानले. बैठकीला युवक आघाडीचे अध्यक्ष सोनू सोनटक्के तसेच मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------

मार्गदर्शक सल्लागार समितीमध्ये यांचा समावेश

बैठकीमध्ये मार्गदर्शक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये माजी नगरसेवक देविदास भुजबले, गजानन रेवस्कर, प्रा. कृष्णा फंदाट, भावराव वानखडे गुरुजी, दीपक दही गुरूजी, सुरेशआप्पा घोडेस्वार, अशोक खारोडे, सदाशिव वाघ, श्रीराम सूरे, हुसेन खाँ आलम खाँ, देवीदास तायडे, सुरेश मंत्री, हरीश जिंदे, संतोष राठी, अरविंद फाडके, रामदास खारोडे, सैय्यद इसा सैयद मुसा, प्रकाश सोनटक्के, सदानंद पिंपळकार, सुरेश सोनोने, राजूभाऊ वानखडे, विनोद पोहरकार, संदीप मामनकार, सुशील तायडे, रामेश्वर हागे, शब्बीर शाह इसूब शाह, अमीर खाँ गफ्फार खाँ, शे मुस्ताक, विराग खाँ गुलाब खाँ यांचा समावेश करण्यात आला.

----------------------