शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्यकामांबाबत शिक्षक संघटना एकत्र !

By admin | Updated: November 13, 2015 02:17 IST

बुलडाण्यात समन्वय समिती; नकाशेच्या आत्महत्येनंतर शासनाला सुचविल्या उपाययोजना.

बुलडाणा : अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरातील शिक्षक संघटना एकत्र आल्या असून शाळाबाह्य व शिक्षणेत्तर कामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात राज्यात प्रथमच बुलडाणा येथे १८ संघटनांनी समन्वय समिती स्थापन करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविली आहे. नकाशे यांच्या शाळेत शालेय पोषण आहाराचा ३0 किलो तांदूळ कमी आढळून आला होता, त्यामुळे पंचायत राज समितीने जाब विचारला. या प्रकाराची धास्ती घेत त्यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यातील १८ शिक्षक संघटना शाळाबाह्य व शिक्षणेत्तर कामांबाबत प्रचंड रोष व्यक्त करीत आहेत. प्राथमिक शिक्षकांना ग्रामीण भागात अध्यापन करत असताना विद्याथ्यार्साठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी लागते. ही कामे करताना शिक्षकांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असून गुणवत्ता कमी झाल्याचे खापर शिक्षकांवर फोडण्यात येते. शालेय पोषण आहार योजना राबवताना घडणार्‍या विषबाधा , पुरवठादाराकडून होणारा निकृष्ट माल, इंधन-भाजीपालाची अग्रिम रक्कम न मिळणे या सर्व घटनांना संपूर्णपणे शिक्षकांस जबाबदार धरण्यात येवून निलंबनापासून अटकेपर्यंत कारवाई केली जात असल्याने शिक्षकांमध्ये दशहतीचे वातावरण आहे. अशातच शाळा व्यवस्थापन समितीकडून होणारा मानसिक त्रास वेगळाच असल्याने शिक्षक वर्ग अस्वस्थ आहे.