अकोला : लोकसभा, विधानसभा यांच्यासह आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनुभवल्या असतील; परंतु विधान परिषदेतील शिक्षक मतदारसंघासाठी घेण्यात येणारी निवडणूक जरा वेगळीच आहे. या निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची र्मयादा नाही, ईव्हीएम मशीन नाही. त्यामुळे ह्यनोटाह्णचा पर्यायदेखील मतदारांसाठी नाही. लोकसभेत उमदेवारांना खर्चाची र्मयादा ७५ लाख रुपये होती; परंतु शिक्षक मतदारसंघात उमेदवारांना खर्चाची र्मयादा नाही. लोकसभेत ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला होता; परंतु या निवडणुकीत मतपत्रिकांचाच वापर केला जाणार आहे. यावर्षी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ह्यनोटाह्ण म्हणजेच ह्यवरीलपैकी कोणीच नाहीह्ण हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. शिक्षक मतदारसंघात मात्र ह्यनोटाह्णचा पर्याय उपलब्ध राहणार नाही. शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना अनामत रक्कम मात्र भरावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १0 हजार रुपये तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. उमेदवारी अर्जावर १0 सूचक मतदारांची स्वाक्षरी जरूरी असणार आहे. ही निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमण मतदान पद्धतीने होणार असल्यामुळे मतपत्रिकेवर मतदारांना आपल्या उमेदवार पसंतीचे क्रमांक ह्यमार्कर पेनह्णने लिहावे लागणार आहेत. या निवडणुकीत सर्व उमेदवार हे शिक्षक असले तरी त्यांना मतदान कसे करावे, हे उमेदवार शिकवित आहेत. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २0 जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत अमरावती विभागातील ५ जिल्ह्यातील ७१ केंद्रांवर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ जून आहे. ४ जूनला अर्जांची छाननी होणार आहे. ६ जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.
शिक्षक निवडणूक ‘जरा हटके’
By admin | Updated: May 31, 2014 01:20 IST