शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

  टॅक्सची थकबाकी भोवली; दोन मोबाइल टॉवर सील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:09 IST

मोबाइल कंपन्यांचे दोन टॉवर सील करण्याची कारवाई सोमवारी मनपाच्यावतीने करण्यात आली.

अकोला : महापालिकेचा मालमत्ता कर जमा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोबाइल कंपन्यांचे दोन टॉवर सील करण्याची कारवाई सोमवारी मनपाच्यावतीने करण्यात आली.महापालिका प्रशासनासमोर मालमत्ता कर जमा करण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे. ही बाब लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त वैभव आवारे यांनी कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवरप्रकरणी संबंधित कंपन्यांनी मनपाकडे मालमत्ता कर जमा करणे भाग असताना मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पूर्व झोन अंतर्गत राम नगरस्थित सुरेश पाटील (जीटीएल मोबाइल टॉवर) यांच्याकडे २०१७ पासून २ लक्ष १३ हजार रुपये तसेच दक्षिण झोन अंतर्गत आदर्श कॉलनी येथील अलकनंदा ढोरे (जीटीएल मोबाइल टॉवर) यांच्याकडे २०१३ पासून १ लक्ष ९२ हजार रुपये कर थकीत होता. सोमवारी संबंधितांचे दोन्ही मोबाइल टॉवर सील करण्यात आले. या कारवाईत सहा. कर अधीक्षक देवेंद्र भोजने, प्रशांत बोळे, सुधीर माल्टे, महेंद्र लंगोटे, उदय ठाकूर, सागर मानकर, दिपराल महल्ले, राजू साळुंके, मोहन घाटोळ, सुरक्षा रक्षक प्रदीप गवई, नीलेश ढगे, शोभा पांडे, तेजराव तायडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका