शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम व-हाडात ४७ ठिकाणी तालुका क्रीडा संकुल

By admin | Updated: December 28, 2014 00:38 IST

क्रीडा क्षेत्राला चालना : बुलडाणा जिल्हा प्रगतीपथावर.

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यानुसार पश्‍चिम वर्‍हाडातील ५६ पैकी ४७ तालुक्यांच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची कामे करण्यात येत आहेत. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे.राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेसाठी चांगले खेळाडू तयार व्हावेत, खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा सुविधा निर्मिती योजना, जिल्हा वार्षिक योजना, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी खेळ अभियान तसेच स्थानिक पातळीवर बीओटी तत्त्वावर तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलांचे निर्माण करण्यात येत आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. याशिवाय चिखली, मेहकर व मलकापूर येथे जलतरण तलाव, चिखली तालुक्यातील सवणा व मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे राष्ट्रीय दर्जाचा इनडोअर हॉल उभारण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी पाच ठिकाणी, वाशिम जिल्ह्यातील ६ पैकी ४, अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी १२ व यवतमाळ जिल्ह्यातील १६ पैकी १३ असे एकूण पश्‍चिम वर्‍हाडातील ५६ तालुक्यांपैकी ४७ तालुक्यात तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे.तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती होत असल्यामुळे विविध खेळांना प्रोत्साहन मिळणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील खेळाडूंना आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी संधी मिळणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी सांगीतले. *क्रीडा संकुलापासून वंचित तालुकेपश्‍चिम वर्‍हाडातील ५६ पैकी ९ तालुके तालुका क्रीडा संकुलापासून वंचित आहेत. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, चिखलदरा व यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, घाटंजी, झरीजामणी या तालुक्यांचा समावेश आहे.