अकोला: पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली झाल्याची चर्चा गुरुवारी दुपारी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये रंगली होती. कर्मचारी पोलीस अधीक्षकांची बदली झाली की काय, याविषयी चर्चा करीत होते. यासोबतच नागपूरवरून एक पोलीस अधिकारी येणार असल्याचेही सांगण्यात येत होते. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना अकोल्यात तीन वर्ष झाले आहे. या तीन वर्षामध्ये जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश मिळविला असून, गुन्हेगारांवर सुद्धा जरब बसविली आहे. यासोबतच त्यांच्या उपस्थितीतच पोलीस लॉनसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्पसुद्धा अकोल्यात उभा राहिला. त्यांच्या तीन वर्षांचा अकोल्यातील कार्यकाळ पूर्ण होत असल्याने, त्यांच्या बदलीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पोलीस अधीक्षकांच्या बदलीची चर्चा चांगलीच रंगली होती, तर काही कर्मचारी पोलीस दलातील बदल्यांची यादी पूर्ण झाल्यानंतरच पोलीस अधीक्षक मीणा यांची बदली होईल, अशी चर्चा करीत होते.
पोलीस अधीक्षकांच्या बदलीची चर्चा
By admin | Updated: April 14, 2017 01:53 IST