शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

पथदश्री कार्याचा आदर्श घ्या

By admin | Updated: August 18, 2014 23:43 IST

छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन

चिखली : शहरातील विकासकामे करणे, परिसरामध्ये असलेल्या महापुरुषांच्या विचारांचे आजच्या पिढीला आदर्श मिळावेत, यासाठी पुतळ्यांचे आणि उद्यानांचे सौंदर्यीकरण हा भौतिक विकास करणे, ही नगरपालिका, लोकप्रतिनिधी यांचे नियमित कर्तव्याचा एक भाग आहे. या कामाबद्दल नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे कौतुक होणे क्रमप्राप्तच आहे; मात्र आमदार राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या भगीरथ जलसंजीवनी प्रकल्प आणि ई-प्रशाला हे उपक्रम राज्यातीलच नव्हे तर देशभरातील लोकप्रतिनिधींनी या कामाचा आदर्श घ्यावा, असे पथदश्री प्रकल्प आहेत, असे गौरवोद्गार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी काढले. चिखली नगर परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळा परिसराचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सौंदर्यीकरणाच्या पूर्ण करण्यात आलेल्या कामाचे लोकार्पण सोमवार, १८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीराजे भोसले (कोल्हापूर) यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राहुल बोंद्रे हे होते तर रिसोडचे आमदार अमित झनक, माजी आमदार बाबूराव पाटील, नगराध्यक्ष शोभाताई नंदकिशोर सवडतकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे, उपाध्यक्ष हाजी दादुसेठ, सरचिटणिस माणिकराव जाधव, सरचिटणिस तथा नगरसेवक दीपक देशमाने, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सत्येंद्र भुसारी, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, अंकुशराव वाघ, प्रा.यशवंत गोसावी, बुलडाणा पं.स.सभापती निसार चौधरी, नंदकिशोर सवडतकर, कैलास खंदारे, राकाँ तालुकाध्यक्ष भगवानराव काळे, शहराध्यक्ष रवि तोडकर, समाधान सुपेकर, प्रदीप पचेरवाल, सिद्धेश्‍वर इंगळे, राम डहाके, उत्तमराव साळोक, भगवानराव भोंडे, दिनदयाल वाधवाणी, कुणाल बोंद्रे, सुनील सुरडकर, दीपक लहाने, राम जाधव, किशोर साखरे, साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि राजर्षी शाहू महाराजांनी रयतेच्या, प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले होते. राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील बंधारे हे कोल्हापूर बंधारे या नावाने आज देशभर ओळखले जातात, त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये झालेले भगीरथ जलसंजीवनी प्रकल्पांतर्गतचे नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम देशभर पथदश्री ठरेल, असे मत केले. चिखलीच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि नगर पालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या गोरगरीब कष्टकर्‍यांच्या मुलांसाठी सुरु केलेला ई-प्रशाला हा उपक्रम सर्वांनी अनुकरण करावा, असाच आहे. छत्रपती शिवराय आणि राजर्षी शाहू महाराजांचा न्यायाचा, रयतेच्या विकासाचा, समतेचा विचार जो-जो पुढे नेईल त्याच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे उभा राहील, अशी ग्वाही महाराजांनी यावेळी बोलताना दिली. शिवशाहू यात्रेदरम्यान या परिसरामध्ये आलो असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करावे, अशी सूचना आपण आमदार राहुल बोंद्रे यांना केली होती, ती त्यांनी पूर्ण केली. ही यात्रा मराठा आरक्षणासाठी असल्याची राळ उठविण्यात आली होती; मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांनी १८ पगड जातींच्या विकासाचा विचार आणि वारसा दिलेला असल्यामुळे या संपूर्ण १८ पगड जातींच्या न्याय्य मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे आघाडीवर असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या प्रसंगी आमदार अमित झनक, माजी आमदार बाबूराव पाटील, प्रा.यशवंत गोसावी, विजय अंभोरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार राहुल बोंद्रे यांच्या कार्याची दखल घेणार्‍या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.सत्येंद्र भुसारी. संचालन प्रसिद्ध कवी अजीम नवाज राही यांनी तर आभार नंदकिशोर सवडतकर यांनी मानले.

** छत्रपतींना दिलेला शब्द पूर्ण केला : आ.बोंद्रे

आमदार राहुल बोंद्रे यांनी १५ जानेवारी रोजी शहरामध्ये आलेल्या शिवशाहू यात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करावे, अशी सूचना आपणांस छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली होती. महाराजांची सूचना आमच्यासाठी आदेश होती. ती पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावलो; मात्र लोकार्पणासाठी महाराजांनी वेळ द्यावी, अशी अट घातली होती. आज या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजेंनी दिलेली सूचना पूर्ण करू शकलो, याबाबत समाधान वाटते आणि त्यासाठी नगरपालिकेचे विद्यमान अध्यक्ष शोभाताई सवडतकर आणि माजी अध्यक्ष अरुणाताई कदम आणि त्यांच्या सहकार्‍यांप्रती ऋृण व्यक्त करणे गरजेचे ठरते. शिवशाहू यात्रेदरम्यान छत्रपती संभाजीराजे राज्यभर फिरले, सर्वसामान्य जनतेच्या व्यथा समजून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला. खर्‍या अर्थाने महाराज छत्रपती सारखेच रयतेमध्ये वावरले, अश्या शब्दांमध्ये आमदार राहुल बोंद्रे यांनी महाराजांच्या शिवशाहू यात्रेचाही गौरव केला.