निवेदनात देशाचे पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांना बॉम्बने उडवून टाकण्याची भाषा वापरणाऱ्या अरुण बनकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. अरुण बनकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष रोहित अव्वलवार, भाजप शहराध्यक्ष रितेश सबाजकर, शहराध्यक्ष हर्षल साबळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी कमलाकर गावंडे, राहुल गुल्हाने, सुमित सोनोने, गंपू शर्मा, संतोष लोडम, आकाश जाधव, राजु इंगोले, संतोष भांडे, नुपेन अरोरा, ऋषिकेश वारे, आशिष गुंजाळ, राणा सोळंके, रवी गोयकर, प्रवीण लोकरे, तुषार बांबल, अवदेश कनोजे व भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याविरूद्ध कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST