यावेळी तेल्हाराचे गटशिक्षणाधिकारी दुतोंडे, डॉ. रवींद्र भास्कर, महेंद्र तरडेजा, मोहन खाडे, तालुका मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष दीपक सोनावणे, तृप्ती बिजवे आदींची उपस्थिती होती. एनएमएमएस ही सरकारकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न १.५ लाखांपेक्षा कमी आहे. दरवर्षी एक परीक्षा घेतली जाते. यावर्षी ५४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमात ५४ विद्यार्थी आणि ३० शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. महेंद्र काकड यांनी संचालन, तर चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक भूषण ठाकूर, प्रवीण रावणकर, अनंत लंके, सुरेखा माकोडे, मनीष निखाडे, विजय पाथ्रीकर, गाडगे, उमेश चोरे, उज्ज्वला तायडे, वंदना गेबाड, संतोष झामारे, सुधीर भिसे, नरेश जोशी, संतोष झामरे, आशिष असवर यांनी परिश्रम घेतले.
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत अकोटचे सुयश; विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:23 IST