शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

अकोला मनपातील स्वच्छता निरीक्षक निलंबित

By admin | Updated: February 24, 2015 01:13 IST

आयुक्तांनी बजावले आदेश.

अकोला : सफाई कर्मचार्‍यांनी नित्यनेमाने साफसफाई करण्याची गरज असून, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने २८ स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक केली. तथापि, शहरातील अस्वच्छता ही स्वच्छता निरीक्षकांना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडल्याचे निदर्शक मानले जात आहे. या त्राग्यातूनच जवाहरनगर परिसराचे कामकाज पाहणारे स्वच्छता निरीक्षक प्रवीण खांबोलकर यांना निलंबित करण्याचा निर्णय सोमवारी मनपा आयुक्तांनी घेतला.शहराच्या प्रत्येक भागात धुळीने माखलेले रस्ते, घाणीने गच्च भरलेल्या नाल्या-सर्व्हिस लाइन व रस्त्यावर ठिकठिकाणी साचणार्‍या कचर्‍यामुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. अस्वच्छतेमुळे विविध साथरोगांनी अकोलेकरांना हैराण करून सोडले आहे. शहरातील अस्वच्छता नागरिकांच्या जिवावर उठली असताना महापालिकेचा स्वच्छता व आरोग्य विभाग कमालीचा सुस्त आहे. सफाई कर्मचार्‍यांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्याकडून साफसफाईची कामे करवून घेण्यासाठी मनपाने २८ स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक केली; परंतु शहरातील एकूणच चित्र पाहता, स्वच्छता निरीक्षक झोपा काढतात की काय, अशी शंका येते. एकाच ठिकाणी अनेक वर्षांंपासून ठाण मांडणार्‍या स्वच्छता निरीक्षकांची उचलबांगडी करण्याचे वृत्त लोकमतमध्ये उमटताच प्रशासनाने दखल घेतली. २२ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जवाहरनगर परिसरासह मुख्य रस्त्यांची अचानक पाहणी केली असता, नालीचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून आले. या प्रकाराला जबाबदार असलेले स्वच्छता निरीक्षक प्रवीण खांबोलकर यांना निलंबीत करण्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले. *अस्वच्छता, उघड्यावर शौच करणे भोवणारसार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणे व उघड्यावर शौच करणार्‍यांची आता खैर नाही. शहरातील हॉटेल, खाद्यपदार्थाची विक्री करणारी ठिकाणे, रुग्णालये यांच्यासह उघड्यावर शौच करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. स्वच्छता निरीक्षकांनी मार्गदर्शक पुस्तिकेचा वापर करून कारवाई करावी, अन्यथा संबंधित स्वच्छता निरीक्षकांकडून दंडाची रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा आयुक्त शेटे यांनी दिला.