शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वोपचार’मध्ये दोन महिन्यांनंतर औषधांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 01:45 IST

शासनाकडून अद्याप निधी नाही: दोघांकडूनच पुरवठा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देयके थकल्याने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील थांबलेला औषध पुरवठा बुधवारी-गुरुवारी काही प्रमाणात करण्यात आला. त्यातून बाह्योपचार कक्षातील गरज भागवणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याची माहिती आहे. पुरवठादारांपैकी दोघांकडून १३ ते १४ प्रकारची औषधे मिळाली आहेत. त्यापैकी काहींनी निधीसाठी पुरवठा थांबवला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १७ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. सर्वोपचारच्या भांडारात १९ औषधांचा साठा संपुष्टात आला होता. पुरवठाच थांबल्याने रुग्णांना बाहेरून औषध विकत आणण्याचे सांगण्यात येत होते. तुटवडा असलेली औषधे जीव वाचविणाऱ्या आहेत. ऐनवेळेवर रुग्णांना ते न मिळाल्यास तो दगावू शकतो. त्यासाठी नातेवाइकांना विकत आणणे भागच पडते. तुटवडा असलेल्या औषधांमध्ये मानसिक रोगी, मधुमेह, रक्तदाब, महत्त्वाची जीवनसत्त्वे, जखमा भरणाऱ्या क्रीम, हृदय, मूत्राशयाचे क्रिटिकल रुग्ण, त्वचा रोगी, गर्भवती महिला, अस्थमा, हृदय बंद पडणारे रुग्ण, घसा, हाडांचे फ्रॅक्चर, शौचास साफ न होणे, आम्लपित्त आणि प्रतिजैविकांचा समावेश आहे. विविध रोगांवर अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या फियालोपेरिडॉल, ग्लिबेन क्लेमाइड, अ‍ॅम्लोडिपाइन, फोलिक अ‍ॅसिड, सोफ्रामायसिन क्रीम, फ्रुसेमाइड, फ्लू कॅमेझोल, फेरस सल्फेट प्लस फोलिक अ‍ॅसिड, इटोफिलाइन्स आणि थिओफिलाइन, एरिथ्रोमायसिन, डिआॅक्झिन-०.२५, अ‍ॅक्लोविरा क्रीम, कॉप्रिमायसिन सिरप, क्लोटोमायसिन, कॅल्शिअम लॅक्टेट, व्हिटामिन डी-५००, बिसाकोडिल, बी-कॉम्प्लेक्स, अ‍ॅण्टासिड, अ‍ॅमॉक्झिलिन सिरप, अ‍ॅम्पिसिलिन यापैकी काही औषधांंचा पुरवठा करण्यात आला आहे. आता रुग्णांना त्याचे वाटप सुरू आहे. शासनाकडून निधी नाहीचऔषधासाठी शासनाकडून तीन कोटींपेक्षाही अधिक निधीची गरज आहे. त्याची मागणीही सर्वोपचार रुग्णालयातून करण्यात आली; मात्र मार्च अखेरनंतरही निधी मिळालेला नाही.आता डिसेंबर २०१७ पर्यंत आवश्यक निधीची मागणी आहे. ते मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.