रामचरितमानस पारायण
अकाेला : येथील राधाकिसन प्लाॅटमधील सत्संग भवनात श्री रामचरितमानस सामूहिक पारायण भक्तिभावात सुरू आहे. या पारायणाच्या नवव्या दिवशी रामराज्याभिषेकाचे विवेचन करण्यात आले. यावेळी भाविक माेठ्या संख्येने उपिस्थत हाेते
ज्ञानेश्वरी संस्थेचा चित्ररथ
अकाेला : येथील ज्ञानेश्वरी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने अपघातासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथास पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी पापळकर यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष पी. एस. पाटील हजर हाेते.
शहरात पल्स पाेलिओ माेहीम
अकाेला : महानगरपालिकेच्या वतीने शहरात उपमहापाैर राजेंद्र गिरी यांच्या हस्ते बाळाला डोस पाजून पल्स पाेलिओ माेहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डाॅ. प्रभाकर मुदगल, प्रवीण डिघाेळे, राजेश नाईकवाडे, राजेश दवंडकर, पल्लवी जाधव, ज्याेती सुरवाडे, शील वाघाेदे, प्रणाली खंडारे आदी उपस्थित हाेते.