शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यात वर्षभरात २८ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 26, 2014 01:05 IST

फक्त ११ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र : सन २00२ पासून १८३ शेतकरी आत्महत्येच्या घटना.

संजय गोतरकर / पातूर (अकोला )पातूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर निसर्गाच्या अवकृपेने सतत होणारी नापिकी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळणे, सावकार व बँकांची कर्जफेड न होणे यामुळे तालुक्यात दरवर्षी शेतकरी आत्महत्या होत आहेत. यावर्षी आतापर्यंत तालुक्यातील २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ११ शेतकरी आत्महत्या शासनाच्या मदतीच्या निकषावर पात्र ठरल्या आहेत. तब्बल १७ आत्महत्या शासनाच्या मदतीच्या निकषांवर अपात्र ठरल्याने, मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतवृष्टी, तर कधी अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी, कोरडवाहू शेती ही आर्थिक जुगार ठरत आहे. तालुक्यात कोरडवाहू शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनचे पीक घेतो. यावर्षी अल्प पावसामुळे पिकाचा उतारा फारच अल्प आला आहे. एकरी अर्धा ते दीड क्विंटल असे उत्पादन झाल्याने आता करावे तरी काय, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. पातूर तालुक्यात सन २00२ ते २00१३ दरम्यान १५५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ६८ शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली, तर ८७ प्रकरणे अपात्र ठरली. यावर्षी आतापर्यंत तालुक्यात २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये २१ पुरुष व सात महिला शेतकर्‍यांचा समावेश आहे. यापैकी ११ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीस पात्र, तर १७ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.