शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुधीर कॉलनीतील जुगारावर विशेष पथकाचा छापा!

By admin | Updated: April 13, 2017 02:09 IST

एकाच महिन्यात त्याच ठिकाणी तिसरी कारवाई : सिव्हिल लाइन्स पोलीस मॅनेज

अकोला : सुधीर कॉलनीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी त्यांच्या पथकासह बुधवारी दुपारी छापा टाकला. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याजवळून रोख रकमेसह सहा हजार ६५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याच ठिकाणावर विशेष पथकाने तिसरी कारवाई केली असून, सिव्हिल लाइन्स पोलिसांचे या जुगाऱ्यांशी साटेलोटे असल्याचे बोलल्या जात आहे.सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सुधीर कॉलनीमध्ये जुगार अड्डा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अड्ड्यावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये त्यांनी तीन हजार रुपये रोखसह तीन मोबाइल जप्त केले. यासोबतच जवाहरनगर येथील रहिवासी ज्ञानेश्वर भिकाजी शिंदे (५९), सुधाकर बळीराम खंडारे (६२, रा. गीतांजली अपार्टमेंट, सुधीर कॉलनी), दीपक श्यामसुंदर मिश्रा (४५, रा. लेबर कॉलनी, तारफैल), रंजन वासुदेव काटकर (४०, रा. दत्तवाडी, लहान उमरी) यांना अटक केली. विशेष पथकाची याच ठिकाणचीही महिन्याभरातील तिसरी कारवाई आहे. विशेष पथकाच्या या कारवाईमुळे सिव्हिल लाइन्स पोलिसांची हप्तेखारी समोर येत असून, त्यांना एकही जुगार अड्डा व वरली अड्डा दिसत नसल्याचा सवाल उपस्थित केल्या जात आहे.खंडणीखोरांचा ठाण्यात प्रवेशखंडनी बहाद्दर, मारहाण, व्यापाऱ्यांना लुटमार करणारे काही स्वयंघोषित राजकीय पक्षाचे पदाधिकारी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये थेट प्रवेश करतात. कोणत्याही गुन्ह्यातील आरोपींना सोडवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना थेट आमीष देण्यात येते. यावरून सिव्हिल लाइन्स पोलिसांचे या गुन्हेगारी प्रवृत्तीशी साटेलोटे असल्याचे स्पष्ट होत आहे.