शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सरकीपाठोपाठ ढेपेचे भाव पाचशेने उतरले

By admin | Updated: May 18, 2017 14:38 IST

ढेपेचे भाव अचानक उतरल्याने पशुपालक सुखावले आहेत तर व्यापार्‍यांना मात्र या घसरणीचा लाखो रुपयांनी फटका बसला आहे.

अकोला: कॉटन सरकीपाठोपाठ ढेपेचेही भाव क्विंटलमागे पाचशे रुपयांनी उतरल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. ढेपेचे भाव अचानक उतरल्याने पशुपालक सुखावले आहेत तर व्यापार्‍यांना मात्र या घसरणीचा लाखो रुपयांनी फटका बसला आहे.अकोला जिल्हा आणि आजूबाजूचा परिसर कापूस पेर्‍याचा म्हणून ओळखला जातो. कापूस पिकविणार्‍या या परिसरात सरकी आणि ढेपेचीदेखील मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. ढेपेचे भावही अकोल्यातून उघडले जातात. मध्यंतरी सरकीचे भाव वधारले त्यामुळे कापूस सरकीपासून तयार होणार्‍या ढेपेचे भावही चढले होते. सरकीचे भाव वाढल्याने पशुपालक त्रस्त झाले होते. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावरही पडला होता. दरम्यान, काही दिवसात सरकीचे भाव कमी झाल्याने ढेपेचे भावही घसरले. सरकीचे भाव २,६00 ते २,७00 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. ते घसरून आता एकविसशे रुपयांवर स्थिरावले आहेत. सरकीचे भाव खाली उतरताच सरकीपासून तयार होणारी ढेपही खाली उतरली आहे. ढेपचे भाव २,३00 रुपयांपर्यंत पोहोचले होते. ते आता खाली उतरत १८00-१९00 रुपये क्विंटलपर्यंत आले आहे. ढेपेचे भाव खाली उतरताच, त्रस्त झालेल्या पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. किमान पाचशे रुपयांनी ढेपचे भाव उतरल्याने पशुपालक सुखावला आहे. एकीकडे पशुपालक सुखावला असला तरी ढेप विक्री करणारा व्यापारी; मात्र दुखावला गेला आहे. ढेपेच्या भाववाढीच्या दृष्टीने ज्या व्यापार्‍यांनी ढेपेचा साठा जमवून ठेवला होता. त्या व्यापार्‍यांना घसरलेल्या ढेपेच्या भावाने लाखोंचा फटका बसला आहे. अकोल्यातील अनेक व्यापार्‍यांना ढेपेच्या भाव घसरणीमुळे लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. क्विंटलमागे पाचशे रुपयांची तफावत प्रथमच समोर आल्याने अनेकांचे कंबरडे मोडले आहे.