शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अवैध होर्डिंग्जबाबत सात दिवसांत अहवाल सादर करा!

By admin | Updated: July 10, 2014 01:29 IST

उच्च न्यायालयाचे अकोला मनपाला निर्देश

अकोला- महानगरपालिका क्षेत्रात अवैध होर्डिंंग्जबाबत प्रशासनाने गांभीर्याने कारवाई केली नसल्याचे ताशेरे ओढत सात दिवसांत कारवाईचा परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने अकोला मनपा प्रशासनाला दिले आहेत. अवैध होर्डिंग्ज लावण्यात आल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचते. शिवाय मनपाला त्यापासून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. उटसुट कुणीही कुठेही होर्डिंंग्ज लावत असल्याने त्याचा त्रास इतर नागरिकांना सहन करावा लागतो. याबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने २१ फेब्रुवारी रोजी मनपा प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील अवैध होर्डिंंग्ज, बॅनर आणि भित्तीपत्रके काढून टाकण्याचे आदेश दिले होते. असाच एक आदेश १५ मार्च २0१३ रोजीसुद्धा उच्च न्यायालयाने पारित करताना ४८ तासांत अवैध होर्डिंंग्ज काढण्यास सांगितले होते. २१ फेब्रुवारी २0१४ च्या आदेशानुसार कारवाई करून मनपा प्रशासनाला तसा अहवाल उच्च न्यायालयात सादर करावयाचा होता. ७ जुलै रोजी न्या. अभय ओक यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत पुणे महानगरपालिकेचा अहवालाबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. तसेच होर्डिंंग्ज काढून टाकण्याबाबत मनपा प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजी पणाबाबत ताशेरे ओढत सात दिवसांत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. १७ जुलै रोजी या प्रकरणातील पुढील सुनावणी होणार आहे.*न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई ४अवैध होर्डिंंग्ज काढून टाकण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई करून अहवाल सादर करण्यात आला होता. ७ जुलै रोजी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने पारित केलेला आदेश अद्याप मनपाला मिळाला नाही. आदेश मिळताच त्याप्रमाणे कार्यवाही करू, असे मनपाचे विधी विभागप्रमुख श्याम ठाकूर यांनी सांगितले.