शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पेयजल योजनेची चौकशी करून अहवाल सादर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:25 IST

तेल्हारा : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील खेलदेश पांडे येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठय़ाच्या अपूर्ण कामाच्या  तक्रारीची दखल विधान मंडळ पंचायतराज समितीने घे तल्याने सदर कामाची चौकशी करून तातडीने चौकशी  करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी  अकोट येथील उपविभागीय अभियंत्यांना दिला आहे.

ठळक मुद्देतक्रारीची पंचायत राजकडून दखल कार्यकारी अभियंत्याचा उपविभागीय अभियंत्याला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील खेलदेश पांडे येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठय़ाच्या अपूर्ण कामाच्या  तक्रारीची दखल विधान मंडळ पंचायतराज समितीने घे तल्याने सदर कामाची चौकशी करून तातडीने चौकशी  करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी  अकोट येथील उपविभागीय अभियंत्यांना दिला आहे.तेल्हारा तालुक्यातील खेलदेशपांडे येथे राष्ट्रीय पेयजल  योजनेंतर्गत बोअरवेल खोदणे, स्वीचरूम बांधणे, पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन टाकणे व एक लाख लीटर क्षम तेची पाण्याची टाकी बांधणे या कामांना सन २0१२ मध्ये  मंजुरी देण्यात आली होती. सदर कामाद्वारे गावात असणारी  पाणीटंचाई दूर व्हावी, याकरिता ६0 लाख रुपयांचा  निधीदेखील मंजूर करण्यात आला होता. सदर कामाचा ठेका अमरावती येथील ठेकेदारास देण्यात  आला होता. त्या कामाचे भूमिपूजन  तत्कालीन चौथ्या वित्त  आयोगाचे राज्याचे अध्यक्ष जे. पी. डांगे व तत्कालीन  विभागीय आयुक्त बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले होते.  अशा स्थितीत कामे मंजूर व निधी उपलब्ध असतानादेखील  पाच वर्षांचा कालावधी उलटूनदेखील सदर काम अद्यापही  अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा  लागतो. मागे तालुक्याच्या दौर्‍यावर आलेल्या विधान मंडळ  पंचायतराज समितीकडे याबाबत खेलदेशपांडे (उबारखेड)  येथील नगरिक प्रफुल्ल भीमराव मोटे यांनी लेखी स्वरूपात  तक्रार सादर केली होती. सदर तक्रारीची पंचायतराज समितीने गांभीर्याने दखल घेऊन  याबाबत सखोल चौकशीचा आदेश दिला असल्याने जिल्हा  परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उ पविभागीय अभियंता अकोट यांना सदर अपूर्ण काम त्वरित  पूर्ण करून झालेल्या कामाची चौकशी करण्याचा व अहवाल  सादर करण्याचा आदेश दिला आहे. 

खेलदेशपांडे येथे अपूर्ण असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे  काम त्वरित पूर्ण करून चौकशी करण्याबाबत आदेश प्राप्त  झाला असून, सदर कामाची चौकशी लवकर करण्यात  येईल.- किशोर ढवळे,उपविभागीय अभियंता,ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, अकोट.