शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी खड्डय़ांचा अहवाल सादर करा!

By admin | Updated: June 16, 2016 02:18 IST

अकोला जिल्हाधिका-यांचे निर्देश : कुचराई केल्यास प्रशासकीय कारवाई.

अकोला: वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांचा अहवाल शनिवार, १८ जून सायंकाळपर्यंंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले. वृक्ष लागवडीच्या कामात कुचराई करणारांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावर्षीच्या पावसाळ्यात वन महोत्सवाच्या कालावधीत १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शासनामार्फत ठरविण्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यात २ लाख ३0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्‍चित करण्यात आले आहे; परंतु वृक्ष लागवडीसाठी शनिवार, ११ जूनपर्यंंत १ लाख ५0 हजार खड्डे खोदण्यात आले असून, उर्वरित ह्य७२ हजारांवर खड्डे खोदण्याचे काम रेंगाळलेह्ण या आशयाचे वृत्त १२ जून रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. संबंधित वृत्ताची दखल घेत, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी जिल्हास्तरावर विविध विभागप्रमुख आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांची बैठक घेतली. वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांच्या कामाचा आढावा विभागनिहाय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांचा अहवाल १८ जून रोजी सायंकाळपर्यंंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी संबंधित अधिकार्‍यांना यावेळी दिले. जिल्ह्यात २ लाख ३0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असले तरी १ जुलै रोजी सर्व शासकीय कार्यालयांना ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड करावयाची असून, त्यांचे संगोपन करावयाचे आहे, असे सांगत वृक्ष लागवडीच्या कामात कुचराई केल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विजय माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे यांच्यासह विविध विभागप्रमुख आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.