शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सोयी-सुविधांसाठी निधीचे प्रस्ताव सादर करा!

By admin | Updated: December 26, 2014 01:07 IST

जे.पी.डांगे यांचे निर्देश: अधिकार्‍यांची घेतली बैठक.

अकोला : येत्या पाच वर्षांत नागरी भागात करावयाची पायाभूत सोयी-सुविधांची कामेआणि त्यासाठी लागणार्‍या निधी मागणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील नगरपालिकांच्या मुख्याधिकार्‍यांना दिले.अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित अधिकार्‍यांच्या बैठकीत कुळकर्णी बोलत होते. जिल्ह्यातील नगरपालिकांमार्फत करण्यात येत असलेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. येत्या पाच वर्षांत करावयाच्या पायाभूत सोयी-सुविधांविषयक कामांचे नगरपालिकांमार्फत करण्यात आलेले नियोजन आणि या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबतचे प्रस्ताव राज्य वित्त आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना डांगे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अरुण शिंदे, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी पी. यू. गिरी यांच्यासह जिल्ह्यातील आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा व पातूर या पाचही नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. *मनपा नियोजनाची घेतली माहिती! महानगरपालिकामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजना आणि करण्यात येत असलेली विकासकामे यासंदर्भात राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी माहिती घेतली. येत्या पाच वर्षात शहरात करावयाची सोयी-सुविधांची कामे व त्यासाठी लागणारा निधी याबाबत मनपा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहितीदेखील त्यांनी घेतली.* डीपीसी योजनांचा घेतला आढावा!जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) राबविण्यात येणार्‍या योजनांचा आढावा राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी यावेळी घेतला. जिल्हा नियोजन समितीमार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांसह तेरावा वित्त आयोग, ग्रामदान योजना यासंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा नियोजन विभागाला दिले.