शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात मिळणार सवलत?

By admin | Updated: December 25, 2014 23:35 IST

कृषी विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळेल लाभ.

राजरत्न सिरसाट/अकोला: राज्यात उद्भवलेली दुष्काळस्थिती बघता, राज्यशासनाने दुष्काळी भागातील विविध, शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश संबधीत शिक्षण संस्था, महाविद्यालयांना पाठविले आहेत. कृषी विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आकारले जाते, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सलवत मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या निर्णयाचा लाभ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.विदर्भातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजमितीस पीएचडी, पदव्यूत्तर, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी ५,६१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात कृषी, कृषी जैवतंज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी मिळून ५0 विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी प्रत्येकी ११ हजार ८६ रू पये शिक्षण शुल्क भरावे लागते, तर दुसर्‍या वर्षी ७, ३00 आणि वसतीगृहाचा खर्च मिळून या विद्यार्थ्यांना १४,६८६ रू पये खर्च येतो. कृषीच्या विविध शाखेच्या अभ्यासक्रमाला ४0५ विद्यार्थी आहेत. यातील कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम आणि व्दितीय वर्षासाठी प्रत्येकी ४ हजार रू पये शिक्षण शुल्क आहे. कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी जैवतंज्ञत्रान या पदव्यूत्तर शाखेच्या दोन अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाला ५८,५८६ तर व्दितीय वर्षाला २३,३00 रू पये शिक्षण शुल्क भरावे लागतात. कृषी अभ्यासक्रमाच्या २३ खाजगी महाविद्यालयातून विविध शाखेत शिक्षण घेणारे १,३८0 विद्यार्थी असून, कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या ५७ आणि कृषी विद्यापीठाच्या ६ मिळून ६३ कृषी तंत्रज्ञान शाळा आहेत. या शाळामध्ये ३,७८0 विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाला आहेत. राज्यातील दुष्काळीस्थिीती बघता, यासर्व विद्यार्थ्यांंना शासनाने शिक्षण शुल्काची सवलत जाहीर केली आहे. या संबधीचे पत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह नाशिक व अमरावती विभागाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. डॉ. पंदेकृविचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम.भाले यांनी शासनाचे पत्र प्राप्त झाले असल्याचे सांगून शिक्षण की परीक्षा शुल्क माफ करणार याबाबत आताच काही सांगता येणार नसल्याचे सांगीतले. कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कच घेतले जात असल्याने शासनाला शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांंना द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.