शाळा, महाविद्यालये असाे वा खासगी शिकवणी वर्गात शिक्षकांसमाेर बसून अभ्यास करण्याची सवय असणाऱ्या लहानमाेठ्या विद्यार्थ्यांवर अचानक चार भिंतीच्या आत माेबाइलद्वारे ऑनलाइन शिक्षण घेण्याची वेळ ओढवली आहे. काेराेनाची लागण टाळण्याच्या अनुषंगाने सुरुवातीला हा तात्पुरता उपाय याेग्य वाटत असला तरी आता दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसह पालकांनाही भाेगावे लागत असल्याचे चित्र समाेर आले आहे. त्यामुळे काहीही करा; परंतु आमच्या पिढीचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाऐवजी ऑफलाइन शिकवणी वर्ग सुरू करण्याची मागणी खुद्द विद्यार्थ्यांमधूनच हाेत आहे.
घरी माेबाइलद्वारे अभ्यास करताना लक्ष केंद्रित हाेत नाही. वर्गात शिक्षकांसाेबत प्रत्यक्ष संवाद साधला जात असल्याने मनातील नानाविध प्रश्नांचे तातडीने निराकरण हाेते. माेबाइलद्वारे असे प्रश्न विचारताच येत नाहीत.
- कुणाल शर्मा, विद्यार्थी
वर्गात शिक्षकांसाेबत चर्चा करून काेणत्याही विषयावर मार्गदर्शन घेता येते. ऑनलाइन शिक्षण पद्धतीत ही बाब शक्य हाेत नाही. माेबाइलवर विषयाचे ज्ञान आत्मसात करताना मानसिक गाेंधळ उडत आहे. त्यामुळे ही पद्धत लवकर बंद व्हावी, अशी अपेक्षा आहे.
-पार्थ पाटील, विद्यार्थी
ऑनलाइन शिक्षण हा तात्पुरता पर्याय असला तरी ताे आता नकाेसा झाला आहे. शिक्षकांसमाेर बसून अभ्यास आत्मसात करता येताे. घरी अभ्यास करताना अनेकदा अडचणी उद्भवतात. मनातील प्रश्न विचारण्याची साेय नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
-ओम देवपुजे, विद्यार्थी
सुरुवातीचे काही दिवस आमच्यासह पालकांना ऑनलाइनचा पर्याय याेग्य वाटला. परंतु आता दुष्परिणाम समाेर येत आहेत. ऑफलाइनमध्ये शिक्षक आम्हाला वेळ देऊन समजावून सांगतात. माेबाइलच्या वापरामुळे मानदुखी, डाेकेदुखी वाढली आहे.
- वैष्णवी किल्लेदार, विद्यार्थिनी
घरामध्ये ऑनलाइन अभ्यास करताना लक्ष विचलित हाेते. सहा-सहा तास अभ्यास करीत असताना व शिक्षकांसाेबत एकतर्फी संवाद हाेत असल्याने विषयाचे आकलन करणे अवघड झाले आहे. शिकवणी वर्गात जबाबदारीचे भान ठेवत अभ्यास केला जाताे.
- तृप्ती शेलकर, विद्यार्थिनी
ग्रामीण भागात नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. आर्थिक स्थिती नाजूक असताना पालकांनी महागडे माेबाइल दिले, त्याचा उपयाेग नाही. इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू केले असतानाच आता शिकवणी वर्गही सुुरू व्हावेत.
-साक्षी गायकवाड, विद्यार्थिनी
शिक्षकांसमाेर बसून अभ्यास करण्याच्या सवयीत अचानक बदल झाल्यामुळे मानसिक गाेंधळ उडाला आहे. ऑनलाइन अभ्यास करताना विषयाचे नेमके आकलन हाेत नाही. वर्गात प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. ही बाब ऑनलाइनद्वारे शक्य नाही. घरी थाेडा आळस केला जाताे.
-रेणुका जवर, विद्यार्थिनी
ऑनलाइन अभ्यास करताना सेल्फ स्टडीकडे दुर्लक्ष झाले आहे. ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने डाेळ्यांना त्रास हाेऊन मायग्रेन व मानदुखीच्या समस्येत वाढ झाली आहे. ऑफलाइनमध्ये शिक्षक वर्गात समस्या साेडवून मार्गदर्शन करतात. ऑनलाइनमध्ये या बाबी शक्य नाहीत.
-वैदेही राठी, विद्यार्थिनी
..फाेटाे प्रवीण ठाकरे...