शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील विद्यार्थ्यांंचा जीव धोक्यात

By admin | Updated: October 9, 2015 01:42 IST

असामाजिक तत्त्वांचा वाढला संचार; वसतिगृहाचे गृहपालाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.

अकोला: टिळक रोडस्थित त्रिवेणीश्‍वर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा संचार वाढल्याने विद्यार्थ्यांंंच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संभावित धोका लक्षात घेता पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन वसतिगृहाचे गृहपाल यांनी पोलीस निरीक्षकांना गुरुवारी दिले. त्रिवेणीश्‍वर कॉम्प्लेक्सच्या तिसर्‍या माळ्य़ावर शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह असून, येथे जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांंंनी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांंंना उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे, या अनुषंगाने वसतिगृहात आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. परंतु, या सुविधांचा अधिकतर उपयोग काही गुंड प्रवृत्तीचे लोक करत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. इमारतीच्या पायर्‍यांवर मद्यपान करून तेथेच अस्वच्छता पसरविण्यात येते. या सोबतच वसतिगृह परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे चालत आहेत. एवढेच नव्हे तर या मंडळींचा हस्तक्षेप वसतिगृहामध्ये वाढत आहे. विद्यार्थ्यांंंसाठी असलेल्या वसतिगृहातील स्वच्छतागृहाचा उपयोगदेखील ही मंडळी करत आहे. या बाबत त्यांना टोकल्यास विद्यार्थ्यांंंना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांंंना मानसिक त्रास व्हावा म्हणून दररोज वसतिगृहाच्या मोटार पंपाची विद्युत वाहिनी खंडित करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांंंना नेहमीच पाण्यापासून वंचित राहावे लागते. वसतिगृहात असामाजिक तत्त्वांच्या वाढत्या संचारामुळे येथे मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दररोज होणार्‍या वादामुळे विद्यार्थ्यांंंच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाने संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन वसतिगृहाच्या गृहपालांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुरुवारी दिले.