शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची होरपळ !

By admin | Updated: September 7, 2015 00:04 IST

मेहकर तालुक्यातील आश्रम शाळा दुर्लक्षीत; शैक्षणिक साहित्यापासून विद्यार्थी वंचीत.

मेहकर (जि. बुलडाणा) : आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात ५४७ आश्रमशाळा असून यामध्ये १ लाख ८७ हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहे. बहुतांश आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राचे शैक्षणिक साहित्य अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य शासनाने १९७२ मध्ये आदिवासी विकास विभागाने आदिवासी अपर आयुक्त कार्यालयांतर्गत नाशिक विभागात २२२, ठाण्यात १२३, अमरावतीत १00 आणि नागपूर येथे १0२ अशा एकूण ५४७ आदिवासी मुलांच्या आश्रमशाळा सुरू केल्या. आज रोजी राज्यभरातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये १ लाख ८७ हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. त्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात भाजीपाला, अन्नधान्य, शालेय साहित्य, बूट, गणवेश आदी सुविधा दिल्या जातात; मात्र नवीन शैक्षणिक सत्र २0१५-१६ चालू होवून तीन महिण्याचा काळ लोटला, तरीही आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, कंपासपेटी, रंगपेटी, पाटी, पेन्सिल, फुटपट्ट्या, गणवेशासाठी कापड, बूट मिळालेले नाहीत. धान्य, शालेय साहित्य, गणवेश आणि बूट यांची खरेदीची निविदा प्रक्रिया ३१ मेपयर्ंत पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र आदिवासी विकास विभागातील नियोजनाअभावी या सर्व निविदा प्रक्रिया खोळंबल्या आहेत. त्याचा नाहक त्रास स्थानिक प्रशासन आणि आदिवासी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच राज्यातील आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांची शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने बर्‍याच आश्रमशाळांत शिक्षकच नसल्याचे वास्तव आहे. दुर्लक्षीत आदिवासी आश्रम शाळांमध्ये अपुर्‍या शैक्षणिक सुविधा, तुटपुंजे शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी वर्गांचा अभाव असल्याने विद्याथ्याच्या समस्या वाढल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

       आदिवासी विद्यार्थ्यांंचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पुरवठा करण्यात येणारी दूध, केळी, अंडी, सफरचंद जवळपास १ ऑगस्टपासून बंद आहे. प्रशासनाचे आदेश असतानाही अनेक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा पोषक आहार मिळत नसल्याने विद्यार्थ्यांंचे आरोग्य धोक्यात आले आहे.