शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून मारहाण; आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास

By admin | Updated: July 4, 2017 02:41 IST

अकोला: रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीची थट्टामस्करी केल्याने झालेल्या वादातून आरोपीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौथे सहदिवाणी न्यायाधीश यशदीप मेश्राम यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीची थट्टामस्करी केल्याने झालेल्या वादातून आरोपीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौथे सहदिवाणी न्यायाधीश यशदीप मेश्राम यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी रामेश्वर ऊर्फ रामा लक्ष्मण मोरखडे (रा. अकोट फैल) याला तीन वर्ष सश्रम कारावास आणि ४0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लक्ष्मी क्षीरसागर हिच्या तक्रारीनुसार तिचा पती संजय क्षीरसागर हा ९ सप्टेंबर २00७ रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास किराणा दुकानावर जात असताना, आरोपी रामा मोरखडे याने त्याच्यासोबत थट्टामस्करी केली. संजयने त्याला जाब विचारला असता, आरोपी रामा मोरखडे याने संजयला पकडून जवळील हातपंपावर आपटले आणि लोखंडी पाइपने त्याच्या हातापायांवर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३२६, ५0४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून रामा मोरखडे याला तीन वर्ष सश्रम कारावास आणि ४0 हजार रुपये दंड, न भरल्यास एक वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली. दंडातील रकमेपैकी ३0 हजार रुपये संजय क्षीरसागर यास देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तक्रारकर्त्याची बाजू सहायक सरकारी विधिज्ञ विजय पंचोली, करुणा महाजन यांनी मांडली. आरोपीस १३ दिवसांच्या कारावासाची शिक्षाकिरकोळ वादातून मारहाण करणारा आरोपी शेख हारुण शेख कदीर (४0 रा. पूरपीडित कॉलनी) याला चौथे सहदिवाणी न्यायाधीश यशदीप मेश्राम यांनी १३ दिवसांचा कारावास आणि एक हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. अकोट फैलातील इंदिरा नगरात राहणारे इलियास खान निरबाज खान यांच्या तक्रारीनुसार किरकोळ कारणावरून आरोपी शेख हारुण शेख कदीर याने वाद घातला आणि त्याला मारहाण करून जखमी केले. इलियास खान यांच्या तक्रारीनुसार अकोट फैल पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने न्यायालयाने त्यास १३ दिवसांचा कारावास आणि एक हजार रुपये दंड, न भरल्यास १0 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी विधिज्ञ अ‍ॅड. विजय पंचोली यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी हेकाँ रमेश राठोड यांनी केली.