शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

टोकनसाठी रास्ता रोको!

By admin | Updated: May 23, 2017 01:15 IST

बार्शीटाकळीत टोकन वाटप बंद केल्याने शेतकरी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी: नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पुन्हा तुरीची खरेदी सुरू होणार आहे. त्यासाठी २२ मे रोजी शेतकऱ्यांना टोकनचे वाटप करण्यात आले. १५० टोकनचे वाटप केल्यानंतर बाजार समितीने वितरण बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रात्री ९ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले तसेच सर्वच शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. बार्शीटाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावर नाफेडच्या वतीने तुरीची खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीच्या आवारात असलेली तूर खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपली नोंदणी करावी, असे आवाहन शासनाने केले होते. त्यानुसार २२ मेपासून टोकनचे वितरण करण्यात आले. बार्शीटाकळी येथेही सोमवारी टोकनचे वाटप सुरू करण्यात आले. टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. भर उन्हात शेतकऱ्यांनी दिवसभर उभे राहून टोकन घेतले. सायंकाळी १५० टोकन घेतल्यानंतर बाजार समितीने टोकनचे वाटत बंद केले. त्यामुळे दिवसभर उन्हात राहूनही टोकन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी रात्री ९ वाजता बाजार समितीच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनाची माहिती मिळताच बार्शीटाकळीचे तहसीलदार रवी काळे व ठाणेदार सतीश पाटील यांनी घटनास्थळावर धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. तसेच तहसीलदारांनी बाजार समितीस सर्वच शेतकऱ्यांना टोकन देण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आज दिवसभरात २७७ टोकनचे वितरण करण्यात आले असून, २४ मेपासून शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश शेळके यांनी सांगितले.