शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

पोलिसांवर दगडफेक!

By admin | Updated: July 18, 2016 02:22 IST

दारुड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांदखॉ प्लॉटमध्ये प्रचंड दगडफेक; दोन पोलीस किरकोळ जखमी.

अकोला: जुने शहरातील हरिहरपेठेतील चांदखॉ प्लॉटमध्ये रहिवासी असलेल्या एका दारुड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांदखॉ प्लॉटमध्ये रविवारी सायंकाळी प्रचंड दगडफेक झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले असून समाजकंटकांनी पोलिसांवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्नही केला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.  या परिसरात संध्याकाळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.चांदखॉ प्लॉट परिसरातील रहिवासी सुरेश नवलकार हा यथेच्छ मद्यप्राशन करून चांदखॉ प्लॉटमधील इच्छा चहाच्या टपरीवर आला. त्यानंतर काही जणांशी वाद घालून त्याने त्या ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य करीत परिसरातील नागरिकांनाही अश्लील शिवीगाळ केली. तो दारू प्यायला असल्याने नागरिकांनी त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनीही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दारूच्या नशेत तर्र असलेल्या सुरेश नवलकारने अख्तर नावाच्या पोलीस कर्मचार्‍यास धक्काबुक्की केली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दारुड्याचे आक्षेपार्ह वक्तव्य वाढतच गेल्याने वातावरण जास्त चिघळले. या दारुड्याच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे संतप्त झालेल्या काहींनी प्रचंड दगडफेक केल्याने दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. या दगडफेकीनंतर शहरासह जिल्हय़ात जातीय दंगल भडकल्याची अफवा पसरली. या दगडफेकीत ठाकूर नावाच्या कर्मचार्‍याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण आणि जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रियाज शेख हे घटनास्थळावर दाखल झाले. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर दंगलसदृश परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांनी पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस दलास पाचारण केले. पोलिसांनी रस्त्यांवरील दुकाने बंद केली. या प्रकरणी सदर दारुड्यास जुने शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंंत सुरू होती. जातीय दंगलीची अफवाहरिहरपेठेतील चांदखॉ प्लॉटमध्ये दगडफेक झाल्यानंतर जातीय दंगल भडकल्याची अफवा पसरली होती; मात्र पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

बाजारपेठ बंददगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील दुकाने तातडीने बंद केली. कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर लगेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दारुड्यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.