शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

मुसा कॉलनीतून गांजा चरसचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:17 IST

रामदास पेठ पोलिसांची कारवाई अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुसा कॉलनी येथील रहिवासी एक युवक त्याच्या राहत्या ...

रामदास पेठ पोलिसांची कारवाई

अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुसा कॉलनी येथील रहिवासी एक युवक त्याच्या राहत्या घरातून गांजा चरस व इतर अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री करीत असल्याच्या माहितीवरून रामदास पेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला. या ठिकाणावरून ११०० ग्राम गांजा व चरस जप्त करण्यात आली आहे.

मुसा कॉलनी येथील रहिवासी फैजान खान लतीफ खान वय २० वर्ष हा त्याच्या राहत्या घरातून अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरात छापा टाकून घरातून अकराशे ग्राम गांजा व ७० ग्राम चरस जप्त केली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस ॲक्ट अन्वय रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास पेठचे ठाणेदार गजानन गुल्हाने, पीएसआय संदीप मडावी, प्रशांत इंगळे, किशोर गवळी, शेख हसन, तोहिद अली काझी, अन्सार, संजय आकोटकर, गजानन खेडकर, श्रीकांत पातोंड, स्वप्निल चौधरी, विशाल चव्हाण, शिव कुमार दुबे, अमोल शिरसाट व महिला पोलीस अंमलदार दीपाली अग्रवाल यांनी केली. यापूर्वीही या परिसरातून मोठ्या प्रमाणात गांजा विक्री करीत असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने गांजा जप्त केला आहे. त्यावरून शहरात गांजा चरस यासह विविध अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.