शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्टेथोस्कोप ते लाल दिवा!

By admin | Updated: December 6, 2014 00:55 IST

रणजित पाटलांचा सुखद राजकीय प्रवास.

डॉ. किरण वाघमारे / अकोलाआलेल्या संधीचे सोने करणे ज्याला जमते, तोच जीवनात यशस्वी होतो, हे सिद्ध केले आहे अकोल्याचे आमदार आणि विद्यमान मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी. स्टेथोस्कोप हातात घेऊन रुग्णांची तपासणी करणारा हा डॉक्टर आता मंत्री म्हणून राज्यातील जनतेच्या नाड्या तपासणार आहे. रणजित पाटलांचा सुखद राजकीय प्रवास सर्वांसाठीच आश्‍चर्यकारक आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी-मुंगशी या छोट्याशा गावातील असलेले रणजित पाटील व्यवसायाने हाडाचे डॉक्टर असले तरी हाडाचे शेतकरीही आहेत. आजही ते आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून शेतीकडे लक्ष देतात. ्त्यांचे वडील व्ही.एन. पाटील हे विधान परिषदेवर सहा वर्षे आमदार होते. लहानपणापासूनच राजकारण त्यांनी जवळून बघितले. अनेक मोठय़ा नेत्यांना अनुभवण्याची, त्यांना ऐकण्याची संधी रणजित पाटील यांना मिळाली. यातूनच त्यांची राजकारणाची जडण-घडण झाली. राजकारण अनुभवत असतानाच अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून रणजित पाटील यांनी शहरात ओळख निर्माण केली. जठारपेठेतील विठ्ठल हॉस्पिटल हे अनेक रुग्णांसाठी आशेचे ठिकाण ठरले. येथे येणार्‍या रुग्णाचा आजार बरा झाला पाहिजे, याला पाटील यांनी नेहमीच प्राधान्य दिले. रुग्णाच्या खिशात पैसे असो अथवा नसो, त्याचे समाधान यालाच पाटील यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक भानदेखील रणजित पाटील यांनी कायम राखले. याची दखल घेत भाजपने त्यांना विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाचे तिकीट दिले.पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. कारण त्यांच्या सामना या मतदारसंघातील दिग्गज नेते व पाच टर्म आमदार राहिलेले प्रा. बी.टी. देशमुख यांच्याशी होता. पाटील यांचा हा विजय सर्वांसाठीच आश्‍चर्याचा धक्का होता.