शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तत्काळ सुरू करा : युवाविश्व संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:13 IST

पालकमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेऊन कक्ष सुरू करण्याचा दिला आदेश अकोला : येथील युवाविश्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. ...

पालकमंत्री बच्चू कडू यांनी दखल घेऊन कक्ष सुरू करण्याचा दिला आदेश

अकोला : येथील युवाविश्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. संतोष गावंडे यांनी जिल्हा सर्वोपचार कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष सुरू करण्याकरिता शनिवारी पालकमंत्री बच्चू कडू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी हा कक्ष तातडीने सुरू करण्याचा आदेश दिला.

कोविड या आजारामध्ये इतर औषधोपचारासोबत प्लाझ्मा हे प्रतिजैविक म्हणून काम करते. अकोला जिल्ह्यात प्लाझ्मा विलगीकरण कक्ष फक्त जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला होता, जिल्ह्यात इतर कोणत्याही रक्तपेढीला ती मान्यता नाही. असे असताना देखील आणि मध्यंतरीच्या कालावधीत राज्यात अकोला आरोग्य विभागामध्ये कोविड-१९ च्या रुग्णांचे प्रमाण सगळ्यात जास्त वाढले होते. तरीदेखील जवळपास मागील सात महिन्यांपासून जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष बंद करण्यात आला होता. याचा फार मोठा त्रास कोविड रुग्णांना आाणि त्यांचे नातेवाईक यांना होत होता. नाइलाजास्तव रुग्णांच्या नातेवाइकांना अमरावती व नागपूर येथून प्लाझ्मा आणावा लागत होता.

अकोला जिल्ह्यातील कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना होणारा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड लक्षात घेता जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाने कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तत्काळ सुरू करावा, अशी मागणी अ‍ॅड. संतोष गावंडे यांनी महाराष्ट्रदिनी सकाळी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली. यावेळी अ‍ॅड. गावंडे यांच्यासोबत साथ ब्लड हेल्पलाइनचे आशिष कसले, ''युवाविश्व''चे अ‍ॅड. ऋषिकेश जुनारे, जया बोचे जुनारे, अविनाश नाकट व संदीप महल्ले उपस्थित होते.

पालकमंत्री यांनी या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन ध्वजारोहण झाल्याबरोबर ताबडतोब सर्वोपचार रुग्णालयात जाऊन कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष तत्काळ कार्यान्वित करण्याचा आदेश दिला.