शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार घरांसमोर निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST

सोडियम हायपोक्लोराइड द्रावणाची फवारणी करत विषाणू मुक्तीचा यशस्वी प्रयत्न केला गेला अशी माहिती रश्मी देव यांनी दिली. दिवंगत नगरसेविका ...

सोडियम हायपोक्लोराइड द्रावणाची फवारणी करत विषाणू मुक्तीचा यशस्वी प्रयत्न केला गेला अशी माहिती रश्मी देव यांनी दिली. दिवंगत नगरसेविका अ‍ॅड. धनश्री देव यांच्या कोरोना संसर्गातून झालेल्या निधनानंतर प्रभागातील कोणावर ही परिस्थिती ओढावू नये. म्हणून हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

घरात प्रवेश करताना अंगण व रस्त्यावर विषाणू नसावा. रस्त्यावरचा विषाणू घरात जाऊ नये यासाठी प्रभागातील अंतर्गत रस्ते,आंगण आणि सर्व्हिस लाईन्समध्ये ही फवारणी करण्यात आली. स्थानिकांनी या फवारणीचे जोरदार स्वागत व सहकार्य केले. कोरोना विषाणूजन्य आजार असून श्वसन रोग आहे. हा आजार माणसे शिंकली, खोकली तर त्यामुळे उडणाऱ्या तुषारांमुळे पसरतो. वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागावर कोरोनाचे विषाणू बराच काळ टिकून राहतात. त्यामुळे अशा दूषित पृष्ठभागाशी थेट संपर्क आल्यास आजार संक्रमित होऊ शकतो. मात्र या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी रासायनिक जंतुनाशकांचा वापर करणे सर्वात परिणामकारक आहे. या प्रभावी उपायामुळेच सर्वजण संक्रमणापासून दूर राहू शकणार आहेत. रस्त्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. सोडियम हायपोक्लोराइड वापरून सार्वजनिक स्थळांचे निर्जंतुकीकरणासाठी प्रयत्न केला जात आहे.

या भागात केले निर्जंतुकीकरण

प्रभाग तीन मधील ज्योतीनगर, प्रसाद कॉलनी, केला प्लॉट, अमृत सोसायटी, बिर्ला ए.बी.सी कॉलनी, गड्डम प्लॉट, न्यू तापडीया नगर, पंचशील नगर, शंकर नगर, गुप्ते रोड, दिवेकर आखाडा, निर्मल नगर, चैतन्य नगर, दुबे वाडी प्रभागातील सर्व मंदिरे, बौद्ध विहार येथे विशेष फवारणी करण्यात आली. आधुनिक पद्धतीने सुमारे तीन हजार घरासमोर ही फवारणी केल्या गेली. नागरिकांनी या फवारणीचे व अभियानाचे स्वागत केल्याची माहिती रश्मी देव यांनी दिली. कोरोना काळात मास्क लावणे, लस घेणे यासाठीची जनजागृती करण्यात येत आहे. जनकल्याणचे काम सुरु राहील असे ही रश्मी देव म्हणाल्या.