शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बालकांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचे विशेष कार्यदल गठित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

अकोला : लहान बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचे ...

अकोला : लहान बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचे विशेष कार्यदल (टास्क फोर्स) गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवार, २८ मे रोजी दिला असून, या विशेष कार्यदलात १८ तज्ज्ञांचा समावेश आहे.

या विशेष कार्यदलाचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर असून, सदस्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अकोला अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक तथा सदस्य सचिव डॉ. विनीत वरठे, डॉ. मनोज ठोकळ, डॉ. अनुप जोशी, डॉ. अंजली सोनोने, डॉ. एस.एस. काळे, डॉ. नरेंद्र राठी, डॉ. अनुप कोठारी, डॉ. नरेश बजाज, डॉ. विजय आहुजा, डॉ. पार्थसारथी शुक्‍ला, डॉ. किशोर ढोले, डॉ. अभिजित नालट, डॉ. आशुतोष पालडीवाल, डॉ. शिरीष देशमुख, डॉ. विशाल काळे इत्यादी बालरोगतज्ज्ञांचा समावेश आहे.

गठित करण्‍यात आलेल्‍या ‘टास्‍क फोर्स’ने कोविड संसर्गजन्‍य आजारावर आळा घालण्यासंदर्भात आवश्‍यक त्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करणे, तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्‍णांच्‍या बाबतीत रुग्‍णव्‍यवस्‍थापनसंहिता, योग्‍य औषधोपचार, कोविड रुग्‍णालयात विशेषज्ञ डॉक्‍टर व पॅरामेडिकल स्‍टाफची आवश्‍यकता इत्‍यादी सुनिश्चित करण्‍याकरिता स्‍थानिक प्रशासनाच्‍या मदतीने अंमलबजावणी करण्‍याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.