शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

पातूर : तालुक्यात सुरुवातीला दमदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. तालुक्यात ९० टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली असून, शेतकऱ्यांनी ...

पातूर : तालुक्यात सुरुवातीला दमदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. तालुक्यात ९० टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली असून, शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिल्याचे चित्र आहे. यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात दोन हजार हेक्टरने वाढ झाली आहे, तर कपाशीचा पेरा घटला आहे.

गतवर्षी २६ हजार ३३७ हेक्टर, तर या वर्षी २८ हजार १८९ एवढ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. दरम्यान, गतवर्षी सहा हजार १६८ वरून पाच हजार २९३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

यंदा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २२ तारखेला अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे कमालीचे नुकसान झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जूनच्या प्रारंभी जोरदार आलेल्या पावसामुळे पीक पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांना सुमारे सहा आठवडे पावसाची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे प्रारंभीच्या पिकांची उत्पादनक्षमता घटली. त्यानंतर २२ जुलैला आलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे कमालीचे नुकसान झाले आहे. परिणामी, या वर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील नांदखेड, खामखेड, आगीखेड, खानापूर आदी गावांचा पीक पाहणी दौरा झाला आहे. सोयाबीन पिकासोबत इतर पिकांचेही कमालीचे नुकसान झाले असल्याचे आढळून आले आहे. पातूर तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात नुकसानी संदर्भातील अहवाल शासनाच्या पटलावर ठेवला जाण्याची शक्यता आहे.

अशी झाली खरीप हंगामात पेरणी

तालुक्यात ४२ हजार ५०८ क्षेत्रावर विविध प्रकारची पेरणी केली जाते. शेतकरी विविध पिके घेतात. त्यात प्रामुख्याने तूर ४५९३, उडीद १२७४, मूग १२९४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.

पंचनाम्याची प्रक्रिया युद्धपातळीवर

तालुक्यात ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी ५३२ मिलिमीटर पाऊस होता. या वर्षी आजपर्यंत तीनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये अद्यापही २३२ मिलिमीटर पाऊस सध्याच्या घडीला पडला आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात खरीप पिकाचे कमालीचे नुकसान झाले. त्या संदर्भातील पंचनामे करण्याची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.‌

कपाशीवर वाढता उत्पादन खर्च आणि सोयाबीनचा लागणारा कमी खर्च यामुळे तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे.

- डी. एस. शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर

120821\img-20210806-wa0303.jpg

सोयाबीन चार पेरा वाढला