शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात केवळ ५० टक्के क्षेत्रावर पेरणी!

By admin | Updated: July 5, 2017 01:40 IST

अकोला, अमरावती जिल्ह्यांतील पेरण्या खोळंबल्या : शेतकऱ्यांना सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने दडी मारल्याने विदर्भातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पश्चिम विदर्भात १५ लाख १३ हजार ५०० हेक्टरवर (५० टक्के) पेरण्या झाल्या असून, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांतील पेरणीची टक्केवारी सर्वात कमी आहे. येत्या दोन, तीन दिवसांत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना नियमित खरीप पिकांमध्ये फेरपालट करावी लागणार आहे.मागील अनेक वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम शेत उत्पादनावर होत आहे. यावर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने पूरक पावसाचे भाकीत केले होते; पण त्याप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतकरी मात्र सैरभैर झाला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला पावसाच्या अनिश्चिततेचा सातत्याने सामना करावा लागत आहे. तो यावर्षीही समोर आहे. अशी सर्वच बाजूंनी संकटे असताना शेतकऱ्यांनी यावर्षी कृषी निविष्ठांची खरेदी केली; पण आभाळाकडे बघण्यावाचून त्यांच्यासमोर सध्या दुसरा पर्याय नसल्याचे चित्र आहे.पाच जिल्ह्यांतील ३२ लाख ७५ हजार हेक्टरपैकी तीन दिवसांपूर्वी ४८ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात केवळ १३ टक्के तर अकोला जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. अकोला जिल्ह्याच्या ४ लाख ८६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २० हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ३० हजार ३०० हेक्टर (५७ टक्के), वाशिम जिल्ह्यात २ लाख ८६ हजार ६०० हेक्टर (६९ टक्के) तर यवतमाळ जिल्ह्यात ६ लाख २८ हजार ३०० हेक्टरवर (७० टक्के) पेरणी झाली आहे.पेरणी झालेले पीकपाच जिल्ह्यात कापूस ५ लाख २६ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन ७ लाख ५ हजार ७०० हेक्टर, तूर २ लाख ५ हजार ७०० हेक्टर, मूग ४१ हजार, उडीद ४६ हजार तर ज्वारी १,९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यावर्षी कृषी विभागाने खरीप हंगाम पेरणीचे नियोजन करताना मूग व उडीद या पिकात वाढ केली होती; परंतु एक महिना होऊनही सार्वत्रिक पाऊस नसल्याने मूग, उडिदाच्या क्षेत्रात घसरण झाली आहे.