शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण झोन; मालमत्ताधारकांना सोमवारी नोटिस!

By admin | Updated: June 9, 2017 03:55 IST

मनपाचा निर्णय; पुनर्मूल्यांकनाच्या नोटिस तयार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील पूर्व झोनमध्ये मालमत्ता पुनर्मूल्यांकनाच्या नोटिस दिल्यानंतर प्रशासनाने नागरिकांचे आक्षेप स्वीकारले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दक्षिण झोनमधील मालमत्ताधारकांना पुनर्मूल्यांकनाच्या नोटिस देण्याची तयारी मनपाने सुरू केली असून, येत्या सोमवारपासून नोटिसचे वितरण केले जाणार असल्याची माहिती आहे. महापालिका प्रशासनाने १९९८ पासून शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले नाही. निवडणुकांमध्ये मतांचे समीकरण बिघडणार, या भीतीपोटी सर्वपक्षीय नगरसेवकांनीदेखील कधी टॅक्सच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. शहराप्रती आपले दायित्व काय, याचा अकोलेकरांनादेखील विसर पडल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली. शहराचा विकास करायचा असेल तर शासनाच्या निधीत मनपाचा आर्थिक हिस्सा जमा करावाच लागेल, अशी भूमिका घेत शासनाने मनपाला उत्पन्न वाढीच्या कानपिचक्या दिल्या. त्यानुषंगाने मनपा आयुक्त अजय लहाने यांनी ह्यजीआयएसह्ण प्रणालीद्वारे मालमत्तांचा सर्व्हेकरून पुनर्मूल्यांकन केले. पहिल्या टप्प्यात पूर्व झोनमधील २३ हजार मालमत्ताधारकांना नोटिसचे वितरण करण्यात आले. प्रशासनाने १९ वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच पारदर्शीपणे चटई क्षेत्रानुसार मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करीत घर, इमारतींचे मोजमाप केले. शिवाय सुधारित करवाढीचा निर्णय घेतला. या दोन्ही बाबी एकाच वेळेस झाल्यामुळे अकोलेकरांमध्ये टॅक्स वाढीबाबत संभ्रम निर्माण झाला. नागरिकांना दिलेल्या नोटिसवर त्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी मनपाने ५ जूनपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपली असून, आता प्रशासनाने दक्षिण झोनमधील नागरिकांना पुनर्मूल्यांकनाच्या नोटिस देण्याची तयारी सुरू केली आहे. पूर्व झोनमध्ये ५ हजार ४८० आक्षेप४पूर्व झोनमध्ये २३ हजार मालमत्ताधारकांपैकी ५ हजार ४८० मालमत्ताधारकांनी मनपाच्या करवाढीवर आक्षेप नोंदविले. यातील १ हजार ३९० आक्षेप लक्षात घेता संबंधितांच्या मालमत्तांची पुन्हा पाहणी केली जाणार आहे. सर्व्हे करताना संबंधित काही घर मालक बाहेरगावी गेले होते. काही ठिकाणी हिस्से वाटणीचा मुद्दा असून, भाडेकरी आहेत किंवा नाही, आदी मालमत्तांची तपासणी केली जाईल.मुख्य रस्त्यांलगत जादा टॅक्स कसा?मुख्य रस्त्यालगतच्या इमारतींना जादा कर आकारणी करण्यावर नागरिकांचे आक्षेप आहेत. सद्यस्थितीत शहराच्या मध्यभागातील गांधी रोड, मोहम्मद अली चौक, राम नगर, जठारपेठ परिसर, गोरक्षण रोड, रामदास पेठ परिसरातील जमिनींचे भाव शहराच्या इतर भागातील मालमत्तांच्या तुलनेत अधिक आहेत. या भागातील मुख्य रस्त्यांलगतच्या जमिनींचे भाव लक्षात घेऊन कर आकारणी करण्यात आल्याची माहिती आहे.

खोल्या २० अन् टॅक्स फक्त २०० रुपये!मालमत्ता कराची दक्षिण झोनमध्ये सर्वाधिक चोरी केली जाते. सिंधी कॅम्प, कच्ची खोली, पक्की खोली आदी भागातील मालमत्तांना नगण्य कर आकारणी केली आहे. या ठिकाणी २० पक्क्या खोल्या असताना फक्त २०० रुपये टॅक्सची आकारणी करण्यात आल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतील. त्यामुळे मनपाचे आणखी किती काळ आर्थिक शोषण करायचे, यावर अकोलेकरांनी चिंतन करण्याची गरज आहे.