शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील दागिने चोरणारा चोरटा कोठडीत

By admin | Updated: July 19, 2016 01:56 IST

एक सुधारगृहात तर तिसरा आरोपी अद्यापही फरार

अकोला: रायली जिन परिसरातील ओसवाल भवनमधील एका विवाह सोहळय़ातील सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरणार्‍या दोन अट्टल चोरट्यांना रामदासपेठ पोलिसांनी रविवारी अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एका आरोपीस २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर दुसरा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. या प्रकरणातील एक अट्टल चोरटा अद्यापही फरार आहे. जुने शहरातील रहिवासी संदीप दिवेकर यांच्या चुलत भावाचे ओसवाल भवन येथे १३ जुलै रोजी लग्न होते. त्यामुळे मुलीकडील मंडळी व मुलाकडील मंडळी दाग-दागिने घेऊन ओसवाल भवन येथे आले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये चोरट्यांनी पाच सोन्याच्या अंगठय़ा, दोन सोन्याचे गोप, सोन्याचा चपळा हार, सोन्याचा राणी हार, सोन्याचे नेकलेस, सोन्याचे कानातले पाच ग्रॅम आणि नगदी ८३ हजार, असा एकूण ३ लाख २१ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. हा ऐवज चोरी गेल्यानंतर संदीप दिवेकर यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. घटनेनंतर तीन दिवसांच्या आतच पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. इराणी झोपडपट्टीतील गुलाम हसन औलाद हसन, खोलेश्‍वरमधील करण दशरथ वाघमारे या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहे; मात्र रोख रक्कम घेऊन तिसरा चोर फरार आहे. गुलाम हसन याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली.