शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सोनाळ्यात सोनाजी महाराजांचा गजर

By admin | Updated: November 28, 2015 02:43 IST

संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सवात हजारो भाविकांनी घेतला पंगतीमध्ये महाप्रसाद.

चंद्रप्रकाश कडू / सोनाळा (जि. बुलडाणा) : संत सोनाजी महाराजांचा गजर व नामघोषात रथोत्सव सोनाळा येथे झेंडूची फुले व रेवडीच्या उधळणीत २७ नोव्हेंबर रोजी साजरा झाला. या रथोत्सवासाठी सोनाळासोबतच परिसरातील व जिल्हय़ातील हजारो भाविक उपस्थित होते. संत सोनाजी महाराज रथोत्सवाला २६ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता सुरुवात झाली तर सांगता २७ नोव्हेंबर रोजी दुपारी हभप मधुकर महाराज साबळे यांच्या काल्याचे कीर्तन व दहीहंडीने झाली. संपूर्ण गावातून हा रथोत्सव काढण्यात आला. २६ रोजी रात्री संत सोनाजीच्या गजराने सोनाळा गाव दुमदुमले होते. नवस पूर्ण झाल्यावर रथाला नारळाचे तोरण बांधण्याची पूर्वापार परंपरा येथे जपल्या जाते. त्यामुळे यावर्षीही मोठय़ा प्रमाणात भाविकांनी तीन मजली रथाला नारळाची तोरणे बांधली होती. तसेच झेंडूच्या फुलांनी रथ सजविण्यात आला होता. मनोकामना पूर्ण झालेल्या भाविकांनी रथावर झेंडूच्या फुलांची तसेच रेवड्यांची उधळण केली. गावात घरोघरी सडासंमार्जन व रांगोळ्या काढून भक्तिभावात रथाचे पूजन करण्यात आले. या रथोत्सवात गावोगावातून आलेल्या भजनी दिंडी टाळ-मृदुंगासह सहभागी झाल्या होत्या. २६ च्या रात्री प्रकाशबाबा मंदिरात रथ ठेवण्यात येऊन २७ रोजी परत रथयात्रा सुरू झाली. गावातून मार्गक्रमण केल्यानंतर या रथयात्रेचे दुपारी परत संत सोनाजी महाराज मंदिरात आगमन होऊन महाआरती झाली. महाआरतीनंतर बाळाबाप्पू देशमुख यांच्या शेतात शिस्तबद्धपणे पंगतीत बसवून हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी संत सोनाजी महाराज संस्थान विश्‍वस्त गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम घेत आहेत. १११ पोते ज्वारीपासून महाप्रसाद ४यात्रेचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसाद असतो. यावर्षी १११ क्विंटल ज्वारीच्या भाकरी, २१ क्विंटल उडिदाची दाळ व अंबाडीची भाजी असे नियोजन करण्यात आले होते. जिल्हय़ातील खा. प्रतापराव जाधव, आ.डॉ. संजय कुटे, आ.अँड. आकाश फुंडकर, जि.प. सदस्य डॉ. वासुदेव गावंडे या लोकप्रतिनिधींसोबतच प्रसेनजित पाटील, डॉ. केला, विजयकुमार भुतडा आदींसह इतरांनीही सहभागी होऊन दर्शन तसेच महाप्रसाद घेतला.