शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

घनकचऱ्याची अट शिथिल नाहीच; निविदा रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 13:08 IST

अट अद्यापही शिथिल न झाल्यामुळे निविदा प्रक्रिया रखडल्याचा मुद्दा महापौर विजय अग्रवाल यांनी मुंबईत पार पडलेल्या महापौर परिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्दे केंद्र शासनाने ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात सहभागी शहरांसाठी ५०० मेट्रिक टन कचºयाची अट नमूद केली होती. महापौर विजय अग्रवाल यांनी घनकचºयासाठी २०० टनचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता.

अकोला : शहरातून निघणारा दैनंदिन घन कचरा ५०० मेट्रिक टन असेल, तरच अशा शहरांचा ‘वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट’मध्ये समावेश करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश होते. त्यामुळे ५०० मेट्रिक टन कचºयाची अट शिथिल करून ती २०० मेट्रिक टन करण्याचा प्रस्ताव महापौर विजय अग्रवाल यांनी केंद्राकडे सादर केला असता, या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी मिळाली होती. परंतु ही अट अद्यापही शिथिल न झाल्यामुळे निविदा प्रक्रिया रखडल्याचा मुद्दा महापौर विजय अग्रवाल यांनी मुंबईत पार पडलेल्या महापौर परिषदेत उपस्थित केला. ही अट कायम असल्याने लहान शहरांना ‘वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट’मध्ये सहभागी होताना अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.महापालिका क्षेत्रात दररोज मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करून योग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे प्रदूषणासोबतच जलस्रोत दूषित होण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कचºयाचे समूळ उच्चाटन व्हावे, या उद्देशातून केंद्र शासनाने ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात सहभागी शहरांसाठी ५०० मेट्रिक टन कचºयाची अट नमूद केली होती. शहरातून निघणाºया घनकचºयाचे ७५टक्के विलगीकरण करण्यासाठी शासनाने महापालिकांना जून २०१८ पर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये ओला व सुका कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. अकोला शहरात दररोज २०० ते २५० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यामुळे केंद्र शासनाने ५०० टनची अट शिथिल केल्यास ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात अकोला महापालिकेला सहभागी होता येणार असल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापौर विजय अग्रवाल यांनी घनकचºयासाठी २०० टनचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. हा प्रस्ताव केंद्राने अद्यापही मंजूर न केल्यामुळे घनकचºयाची निविदा प्रक्रिया रखडल्याचा मुद्दा महापौर अग्रवाल यांनी मुंबईत पार पडलेल्या १७ व्या महापौर परिषदेत उपस्थित केला.मॅचिंग फंड, शिक्षकांच्या वेतनाचा तिढा सोडवा!जिल्हा परिषद, नगर परिषदेला दिल्या जाणाºया सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेच्या निधीचे निकष मनपाला लागू करण्याची गरज असल्याचे मत महापौर विजय अग्रवाल यांनी व्यक्त केले. तसेच जि.प. व नगर परिषदेच्या धर्तीवर मनपा शिक्षकांच्या वेतनासाठी महापालिकांना १०० टक्के अनुदान देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना महापौर अग्रवाल यांनी केली. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका