शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

फिरते माती परीक्षणात ‘केव्हीके’चा सहभाग वाढला!

By admin | Updated: June 22, 2015 02:16 IST

‘आयसीएआर’ची विदर्भात एकच प्रयोगशाळा.

अकोला : पीक व खतांचे योग्य नियोजन करू न, अन्नधान्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी मातीच्या मगदुरानुसार शेती करण्याची गरज असून, याकरिता यावर्षी प्रत्यक्ष शेतावर जाऊन माती परीक्षणाचे नमुने घेण्यात आले आहेत. याकरिता मानव विकास मिशनद्वारे राज्यासह विदर्भातील कृषी विज्ञान केंद्रांना (केव्हीके) फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध करू न देण्यात आली आहे; पण भारतीय कृषी संशोधन परिषदेची (आयसीएआर) विदर्भाला एकच फिरती प्रयोगशाळा उपलब्ध करू न देण्यात आली असून, आयसीएआरकडून आणखी फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा मिळणार असल्याचे वृत्त आहे. विभागानुसार मातीचा मगदूर, गुणधर्म बदलत असल्याने सर्वच भागात एकसारखी पिके घेता येत नाहीत. पश्‍चिम विदर्भातील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील जमीन काळी आणि भारी आहे; परंतु अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील जमिनीचा काही भाग हलका आहे, तर खारपाणपट्टय़ातील जमिनी चोपन आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांसह शेतकर्‍यांनासुद्धा पीक व खतांचे नियोजन करणे अवघड झाले आहे. दुसरीकडे उत्पादनात मात्र घट होत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करू न जमिनीचा पोत सुधारण्याची गरज असल्याने माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे जमिनीचे गुणधर्म बदललेले असताना, दुसरीकडे शेतात नायट्रोजन, युरियाचा वापर भरमसाट वाढला आहे. परिणामी जमिनीचा पोत आणखी खराब झाला असून, उत्पादनातील घट हे त्याचेच प्रमुख कारण आहे. म्हणूनच चांगले अन्न आणि चांगली शेतजमीन निर्माण करण्यासाठी संशोधनाची नवी दिशा ठरविताना सुरुवातीला माती परीक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.त्यासाठीच जिल्हा तिथे माती परीक्षण प्रयोगशाळा असावी, असा आयसीएआरचा संकल्प आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला एक फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा मिळाली आहे; पण ही प्रयोगशाळा संपूर्ण विदर्भात पोहचू शकत नसल्याने नव्याने फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध करू न देण्याची गरज आहे.