शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीचे आतापर्यंत चार बळी

By admin | Updated: November 22, 2015 02:03 IST

गणेशपूर येथील नागरिकांनी सांगितली व्यथा.

विवेक चांदूरकर / वाशिम : नाथजोगी समाजात यापूर्वीही जातपंचायत भरविण्यात आली असून, अनेकांना दंडही ठोठाविण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा बळी गेला असल्याचे भयानक वास्तव गणेशपूर येथील नागरिकांनी शुक्रवारी मांडले. यामुळे या गावातील नागरिक दहशतीत आहेत. रिसोड तालुक्यात गणेशपूर येथील सुभाष सावंत यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी व वडिलांनी हिंमत दाखवित रिसोड पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडेही या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यामुळे सदर प्रकरण उजेडात आले असून, सर्वत्र गाजत आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गणेशपूर येथे लोकमत चमू गेली असता सावंत यांच्या घराजवळ राहणार्‍या लोकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. अल्प मिळकतीतून संसाराचा गाडा ओढणार्‍या या लोकांना आणखी जात पंचायतींच्या कठोर निर्णयाचाही सामना करावा लागत आहे. अशा प्रकारच्या जात पंचायती यापूर्वीही अनेकदा भरविण्यात आल्या आहेत. तसेच सुभाष सावंत यांचे वडील आप्पाराणू सावंत यांनी यापूर्वीही त्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले. समाजातील विविध लोकांना नेहमीच दंड ठोठावण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले. या जातपंचायतीमुळे होत असलेल्या अन्यायाचे या परिसरातील नागरिकांनी कथन केले. समाजातील जातपंचायतीमुळे आतापर्यंंंंत चार जणांचा बळी गेल्याचा आरोप यांनी केला आहे. कोणतीही मान्यता नसताना जातपंचायत भरविलीच कशी जाते व त्याचा आदेश मान्यही कसा केला जातो, असा आरोपही या लोकांनी केला.